वजन कमी करायचे आहे? मग जेवल्यानंतर 45 मिनिटे पाणी पिणे टाळाच!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि व्यायाम करण्यात येतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी देखील राहतात. तरीही वजन कमी होत नसल्यामुळे अनेकजण आैषध उपचार देखील घेतात.

वजन कमी करायचे आहे? मग जेवल्यानंतर 45 मिनिटे पाणी पिणे टाळाच!
पाणी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 31, 2021 | 10:05 AM

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि व्यायाम करण्यात येतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी देखील राहतात. तरीही वजन कमी होत नसल्यामुळे अनेकजण आैषध उपचार देखील घेतात. मात्र, हे सर्व करूनही वजन कमी होत नसल्याचे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, वजन झटपट कमी करण्यासाठी आम्ही एक टिप्स सांगत आहोत. (To live a healthy life, do not drink water for 45 minutes after a meal)

ते तुम्ही फाॅलो केले तर आपले वजन झटपट कमी होण्यास नक्की मदत होईल. आपल्या सर्वांना माहीती आहे की, पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर आपण जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा. जेवल्यानंतर पाणी पिल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अन्न पचन होत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्यास सुरूवात होते. तसेच पचनाच्या इतर समस्या उद्भवतात.

जेवणाच्या 45 मिनिटे आधी आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पाणी पिणे टाळा. जर आपण हे फाॅलो केले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते. ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो. परंतु जर आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तप्नाम कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(To live a healthy life, do not drink water for 45 minutes after a meal)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें