AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni : त्याच्याबद्दल न लिहिलेलंच बरं, वर्ल्ड कप विजयानंतर धोनी असं कुणाबद्दल म्हणाला?

MS Dhoni On Indian Cricket Team : महेंद्रसिंह धोनी याने भारताला पहिल्याच झटक्यात 2007 साली आपल्याच नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला होता. धोनी रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या अंतिम सामन्याला उपस्थित होता. धोनीने भारताचं तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर अभिनंदन केलं.

MS Dhoni : त्याच्याबद्दल न लिहिलेलंच बरं, वर्ल्ड कप विजयानंतर धोनी असं कुणाबद्दल म्हणाला?
Team India and MS DhoniImage Credit source: Bcci and Icc X Account
| Updated on: Mar 09, 2026 | 12:07 PM
Share

न्यूझीलंडला रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडला या पराभवासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप गमवावा लागला. मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंड उपविजेता ठरली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित या महाअंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेत्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर 96 धावंनी मात करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये ऑलआऊट 156 रन्सपर्यंतच पोहचता आलं. भारताने या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले.

भारताचे एतिहासिक विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड

इंडिया एकूण 3 टी 20i वर्ल्ड कप जिकंणारी पहिली टीम ठरली. तसेच इंडिया सलग 2 आणि मायदेशात वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्यात यशस्वी ठरणारी पहिली टीम ठरली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली. भारताचं या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भारताचं अभिनंदन केलं. धोनीने या पोस्टमध्ये गंभीर तु हसताना चांगला दिसतोस असं म्हटलं. मात्र धोनीने टीम इंडियाच्या एका खेळाडूचं नाव न लिहिलेलंच बरं, असं म्हणत त्याचं नाव घेतलं. याची चर्चा रंगली आहे.

धोनी कुणाबद्दल म्हणाला?

धोनीने टीम इंडियासाठी अभिनंदनाची पोस्ट केली. धोनीने या पोस्टच्या शेवटी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा उल्लेख केला.”बुमराहबाबत काही लिहिलं नाही तरच चांगलं आहे”, असं धोनीने म्हटलं. धोनीने याला जोडून बुमराहाचा “चॅम्पियन बॉलर” असा उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. धोनीच्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

धोनीची इन्स्टा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

बुमराहची कामगिरी

दरम्यान जसप्रीत बुमराह या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने 8 सामन्यांमधील 8 डावांत एकूण 28 ओव्हरमध्ये 12.43 च्या सरासरीने 168 धावा देत एकूण आणि सर्वाधिक 14 विकेट्स मिळवल्या. बुमराहने 14 पैकी 4 विकेट्स या न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात घेतल्या. बुमराहची अशाप्रकारे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 4 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...