Beauty Tips | त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ‘नाचणी’, अशाप्रकारे करा वापर…

नाचणीमध्ये कॅल्शीयम, फायबर, कर्बोदके, लोह, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Beauty Tips | त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ‘नाचणी’, अशाप्रकारे करा वापर...
त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ‘नाचणी’

मुंबई : नाचणीमध्ये कॅल्शीयम, फायबर, कर्बोदके, लोह, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. भाकरी, बिस्किटे, चिप्स, डोसा आणि उपमा, नाचणीच्या पिठाचे सूप देखील बनवळे जाते, जे लोक मोठ्या आवडीने खातात. हे आपल्या आरोग्यासाठी, तसेच त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे (Ragi skin care and hair care benefits).

नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे सूर्य तीव्र किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. तसेच हे घटक केस तुटण्यापासून प्रतिबंधित करतात. जर आपल्याला त्वचेवर आणि केसांच्या समस्येवर रामबाण उपाय हवा असेल, तर नाचणी इतके दुसरे काहीच चांगले नाही. नाचणी वापरुन आपण फेस स्क्रब, फेसपॅक आणि हेअर मास्क बनवू शकता. चला तर जाणून घेऊया की, नाचणी वापरुन आपण केस आणि त्वचा संबंधित समस्यांपासून कशा प्रकारे मुक्त होऊ शकता…

नाचणी फेस स्क्रब

चेहरा स्क्रब करण्यासाठी, नाचणीमध्ये दही मिसळा. नाचणीचे हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि सुमारे 15 ते 25 मिनिटांनंतर ते पाण्याने धुवा. आपण कधीही हा स्क्रब वापरू शकता. हा स्क्रब तुमची त्वचा एक्सफोलीएट करतो आणि त्वचा मॉइश्चराइझ देखील करतो. स्क्रबमध्ये उपस्थित दही सन टॅन काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, नाचणीमध्ये अमीनो आम्ल असतात, जे आपल्या त्वचेचे कोलेजन वाढवण्यास तसेच, त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात(Ragi skin care and hair care benefits).

नाचणी फेस मास्क

नाचणी फेस मास्क तयार करण्यासाठी प्रथम नाचणीची बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यामध्ये उपस्थित असलेल्या फिनोलिक आम्ल आणि फ्लेव्होनॉइड चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डीप पोर्स बंद करण्याचे काम करतात. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्यास तुमची त्वचा चमकदार व मऊ होईल.

नाचणी हेअर मास्क

नाचणीमध्ये अँटी मायक्रोबियल, कॅरोटीनोईड आणि अमीनो आम्ल असतात, ज्यामुळे केस गळणे, डँड्रफ आणि टक्कल या समस्या कमी होण्यास मदत होते. नाचणीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, नाचणीच्या पावडरमध्ये जास्वंदाचे पाणी आणि आवळा पावडर एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर केसांच्या स्काल्पवर मसाज करा. पाच मिनिटांनी आपले केस पाण्याने धुवा. यामुळे आपले केस जाड आणि मजबूत दिसतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Ragi skin care and hair care benefits)

हेही वाचा :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI