AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!

पावसाळ्याच चिकटपणापासून त्वचेची आणि केसांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना लांब सडक, काळेभोर केस आवडतात.

चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी 'हे' हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!
हेअर मास्क
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 31, 2021 | 9:56 AM
Share

मुंबई : पावसाळ्यात चिकटपणापासून त्वचेची आणि केसांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. बहुतेक स्त्रियांना लांब सडक, काळेभोर केस आवडतात. मात्र, पावसाळ्याच्या हंगामात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेष करून पावसाळ्याच्या हंगामात केस गळती मोठ्या प्रमाणात होते. ज्यामुळे टक्कल पडण्याची अधिक शक्यता असतो. (Apply this hair mask to the hair to eliminate the problem of sticky hair)

पावसाळ्यात आपण काही हेअर मास्क आपल्या केसांना लावले पाहिजेत. ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पावसाळ्यामध्ये केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण केसांना ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी हेअर मास्क लावला पाहिजे. 2 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून कॉफी हेअर मास्क तयार करा. हेअर मास्क केसांपासून मुळापर्यंत सर्व केसांवर लावा.

हा हेअर मास्क कमीतकमी 30 मिनिटे सोडा. ते धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा आणि आपण आठवड्यातून एक किंवा दोनदा हा कॉफी हेअर मास्क पुन्हा पुन्हा वापरू शकता. या कॉफी हेअर मास्कमुळे केस गळती कमी होण्यास मदत मिळते. हा हेअर मास्क घरी तयार करण्यासाठी आपल्याला अंडी, दही आणि लिंबू लागणार आहे. यासाठी दोन अंडी, एक वाटी दही आणि चार चमचे लिंबाचा रस लागणार आहे.

हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वात अगोदर वरील तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून घ्या आणि एक जीव करा, हा हेअर मास्क तीस मिनिटांसाठी आपल्या केसांना लावा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा. सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this hair mask to the hair to eliminate the problem of sticky hair)

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद