AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहरा आणि केस निरोगी ठेवण्याचा टू-इन-वन फॉर्म्युला, जाणून घ्या कॉफीचे लाभदायी फायदे

चेहरा आणि केस निरोगी ठेवण्याचा टू-इन-वन फॉर्म्युला, जाणून घ्या कॉफीचे लाभदायी फायदे (two-in-one formula for keeping face and hair healthy)

चेहरा आणि केस निरोगी ठेवण्याचा टू-इन-वन फॉर्म्युला, जाणून घ्या कॉफीचे लाभदायी फायदे
चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
| Updated on: Feb 23, 2021 | 11:25 AM
Share

मु्ंबई : आपला चेहरा आणि केस सौंदर्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. परंतु आजच्या खराब जीवनशैलीमुळे केस गळणे, निर्जीव होणे हे अगदी लहान वयातच सुरू होते. याशिवाय चेहऱ्यावर मुरुम आणि पिगमेंटेशनसारख्या अनेक समस्या उद्भवतात. ज्याचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. जर अशी काही समस्या तुम्हालाही असेल आणि अनेक उपाय करूनही उपयोग झाला असेल तर कॉफीने बनविलेले हेअर मास्क आणि फेस पॅक वापरुन पहा. हे केस आणि चेहरा दोन्ही निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी कार्य करेल. (two-in-one formula for keeping face and hair healthy)

असे बनवा हेअर मास्क?

हेअर पॅक बनवण्यासाठी, एक चतुर्थांश कप नारळाच्या तेलाला कमी तपमानावर गरम करा आणि त्यात एक चमचा भाजलेले कॉफी बीन्स घाला. यानंतर हे केसांवर लावा. हे पॅक वापरण्यापूर्वी केस धुवा. सुमारे एक तासासाठी पॅक लावा. यानंतर सौम्य शॅम्पूने डोके धुवा. यामुळे केस पुन्हा निरोगी दिसू लागतील. तसेच केस गळण्याची समस्याही कमी होईल. आपण आठवड्यातून दोनदा ते वापरू शकता.

हा मास्कही ठरेल लाभदायी

एक चमचा मध आणि कॉफी पावडर घ्या आणि ते ऑलिव्ह ऑईलमध्ये चांगले मिसळा आणि ते आपल्या केसांच्या मुळांना लावा आणि कमीत कमी अर्धा तास ठेवा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. हे पॅक आपले केस हायड्रेटेड ठेवते, तसेच केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.

फेस पॅक कसे बनवाल?

फेस पॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते. कॉफी सूर्याच्या हानिकारक यूव्हीबी किरणांपासून देखील संरक्षण करते. कॉफी फेसपॅकमध्ये मध घालण्याने त्याची गुणवत्ता आणखी वाढते कारण मध त्वचेला अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेट्री, अँटी-एलर्जिक आणि क्लींजिंगचे फायदे देते. यामुळे त्वचा खूप मऊ होते.

हे ही लक्षात ठेवा

1. कॉफी फेस पॅक वापरल्यानंतर काही वेळ घरातून बाहेर पडू नका अन्यथा धूळ आणि मातीचे कण आपल्या पॅकचा परिणाम कमी करतील.

2. फेसपॅक लावण्यापूर्वी तोंड पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुमचा मेकअप असेल तर तो पूर्णपणे काढा.

3. कॉफी फेसपॅक वापरवल्यानंतर उरले असेल तर ते वापरु नका. कारण यामुळे बॅक्टेरिया होऊ शकतात. (two-in-one formula for keeping face and hair healthy)

संबंधित बातम्या

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

Wrinkles Problem | तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येतायत? मग, ‘हे’ उपाय करून पाहा!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...