Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

आपल्याला बर्‍याच काळासाठी आपले शरीर तंदुरुस्त आणि चपळ ठेवावायचे असेल तर यासाठी व्यायामाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. (Fitness and yoga tips)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:35 AM, 23 Feb 2021
Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल...
योगासने आणि व्यायाम

मुंबई : सहसा वयाच्या 60 व्या वर्षी लोकांचे शरीर कमजोर होऊ लागते आणि आपल्याने फारसे काम होत नाही. परंतु, आपल्याला बर्‍याच काळासाठी आपले शरीर तंदुरुस्त आणि चपळ ठेवावायचे असेल तर यासाठी व्यायामाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. मात्र, तंदुरुस्ती म्हणजे कठोर परिश्रम करण्यासाठी जिममध्ये जाण्याविषयी नाही, तर आपण काही हलक्या शारीरिक हालचाल करत सोप्या व्यायाम पद्धतीबद्दल बोलत आहोत. चला तर, अशाच काही योगासनांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे वयाच्या 60व्या वर्षही लोकही स्वत:ला तंदुरुस्त आणि तरूण ठेऊ शकतील (Fitness and yoga tips for staying healthy at the age of 60).

खांदे वाकण्यापासून वाचवेल ‘योगा’

बहुतेक लोकांचे शरीर वयानुसार पुढे पुढे झुकत असते. ही समस्या टाळण्यासाठी खांदे ताणणे आवश्यक आहे. यासाठी, जमिनीवर सरळ उभे रहा आणि आपला एक हात दुसर्‍या हाताच्या खांद्याकडे घ्या. यानंतर, आपण दुसऱ्या हाताच्या कोपरला मागे वाकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे मज्जातंतू ताणून आपल्याला भरपूर विश्रांती मिळेल. दुसर्‍या हाताने समान क्रम पुन्हा करा. हा व्यायाम नियमितपणे केल्यास, आपल्या खांद्यांचे स्नायू बळकट होतील आणि खांदे पुढे वाकणार नाहीत.

वॉल पुशअप्स देखील उपयुक्त

छाती आणि खांद्यांना बळकट करण्यासाठी वॉल पुशअप्स देखील खूप उपयुक्त आहेत. यासाठी भिंतीपासून सुमारे तीन फूट अंतरावर उभे रहा आणि भिंतीवर दोन्ही हाताचे तळवे ठेकवून उभे रहा. मग आपले शरीर भिंतीकडे आणा आणि पुश-अप केल्यासारखे पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. एकावेळी असे कमीतकमी 10 पुशअप करा. अशा दोन ते तीन फेऱ्या नियमित केल्याने बरे वाटेल (Fitness and yoga tips for staying healthy at the age of 60).

पायाचा व्यायाम

वृद्धत्वाची सर्वात मोठी समस्या पायांत येते. हे टाळण्यासाठी पायांचा व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, खुर्चीवर आरामात बसा आणि नंतर एक पाय जमिनीच्या वर जरा उंच करा आणि आपल्या पायाचे घोटे हळू हळू फिरवा. हे दोन्ही पायांनी हा व्यायाम करा. यामुळे पायाचे स्नायू बळकट होतील.

हलकी-हलकी कामे करा

वृद्धावस्थेत स्वत: ला व्यस्त ठेवणे खूप महत्वाचे आहे. घरातील हलकी कामे केल्यामुळे वेळ चांगला घालवला जातो आणि शारीरिकरित्या आपण देखील सक्रिय राहता. यासाठी, बागकामासारखी हलकी कामे करू शकता. याशिवाय दररोज काही वेळ पायी चालणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

(टीप : कोणतेही व्यायामप्रकार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Fitness and yoga tips for staying healthy at the age of 60)

हेही वाचा :