Skin Care | वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचंय? मग ‘या’ काही टिप्स खास तुमच्यासाठी…

जीवनशैलीत काही बदल केल्यावर आणि काही घरगुती उपचार करून, तुम्ही वयाच्या 40व्या वर्षांनंतरही स्वत:ला तंदुरुस्त ठेवून तरूण दिसू शकता.

Skin Care | वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचंय? मग ‘या’ काही टिप्स खास तुमच्यासाठी...
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 4:16 PM

मुंबई : वाढत्या वयातही आपण सुंदर, स्मार्ट आणि तरुण दिसावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु, वयाच्या 40व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, त्वचा सैल होऊ लागते. यापैकी बहुतेक समस्या या स्त्रियांमध्ये दिसून येतात. जीवनशैलीत काही बदल केल्यावर आणि काही घरगुती उपचार करून, तुम्ही वयाच्या 40व्या वर्षांनंतरही स्वत:ला तंदुरुस्त ठेवून तरूण दिसू शकता (Skin Care tips for anti ageing after age of 40 year).

आहारात बदल आवश्यक

जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा. चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा.

योग, प्राणायाम आणि व्यायाम आपल्या रोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. तसेच आपली त्वचा घट्ट आणि चमकदार देखील होते.

हळदीचे दूध

दररोज नियमित झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये प्रतिजैविक घटक आहेत. तसेच, त्वचेच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यात हळद मदत करते. हळद निरोगी त्वचेला चमकदार बनवते (Skin Care tips for anti ageing after age of 40 year).

या टिप्स देखील महत्त्वाच्या :

बेसन आणि हळद फेसपॅक : बेसन, एक चिमूटभर हळद, दही, दूध, लिंबू आणि मध मिसळून फेसपॅक तयार करा. आंघोळ करण्यापूर्वी तो चेहऱ्यावर लावा आणि पूर्णपणे कोरडा होऊ द्या. चेहऱ्यावर फेसपॅक असताना कोणाशीही बोलू नका. फेसपॅक पूर्णपणे सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

स्क्रबिंग : रात्री झोपण्यापूर्वी थोडीशी मलई घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा. सकाळी उठून कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे, आपली त्वचा मुलायम होईल आणि वर्णदेखील उजळेल.

टोमॅटोचा रस : चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी टोमॅटोचा रसदेखील खूप प्रभावी आहे. दररोज आंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावा आणि 20 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Skin Care tips for anti ageing after age of 40 year)

हेही वाचा : 

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.