ऊन लागल्याने हार्ट अटॅक येतो?, तुमच्या मनातील प्रश्नावर डॉक्टर काय म्हणाले?; जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: May 09, 2024 | 3:36 PM

Heat wave and heart attack : बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल की, उन्हात अधिक फिरल्याने हार्ट अटॅक येतो. मात्र, हा हार्ट अटॅक नेमका का येतो आणि त्याच्यापासून आपण कशाप्रकारे बचाव करू शकतो, याबद्दल सविस्तर जाणून घ्या. हेच नाही तर यावर डाॅक्टरांनी देखील आपले मत मांडले आहे.

ऊन लागल्याने हार्ट अटॅक येतो?, तुमच्या मनातील प्रश्नावर डॉक्टर काय म्हणाले?; जाणून घ्या सर्वकाही
heart attack
Follow us on

सध्या देशातील अनेक शहरात तापमानामध्ये मोठी वाढ झालीये. अनेक ठिकाणी तर पारा 40 अंशाच्या वर गेलाय. ऊन अधिक लागल्याने बरेच लोक आजारी देखील पडतात. ऊन लागल्याने हार्ट अटॅक येण्याची देखील खूप शक्यता असते. यासाठी आवश्यक ती काळजी घेणे खूप जास्त महत्वाचे ठरते. उन्हाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही गोष्टी फाॅलो करणे अत्यंत आवश्यक ठरते. हार्ट अटॅक उन्हाळ्यात येण्याची अधिक शक्यता असते. उन्हाचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. आता याबद्दल डॉक्टरांनी देखील मोठे भाष्य केले आहे.

वाढलेल्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमी होते. यामुळेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते. हार्ट अटॅक येण्याची नेमकी कोणतीय लक्षणे आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हार्ट अटॅक येण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे तुम्हाला थकवा जाणवतो. उन्हाळ्यात थकवा लवकर जाणवतो. थकव्यामुळे थेट हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.

बऱ्याच वेळा उन्हात फिरल्याने डोकेदुखी होते. या डोकेदुखीमुळे बीपी वाढण्याची दाट शक्यता असते. जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या. अनेकांना उन्हातून आल्यावर चक्कर येते, अशावेळी देखील हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते, यामुळे अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दिल्लीच्या राजीव गांधी हॉस्पिटलचे कार्डियोलॉजी विभागाचे डॉ. अजित जैन यांनी याबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची माहिती दिलीये. डॉ. अजित जैन म्हणाले की, उष्माघातामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. वाढत्या उन्हामुळे आपले शरीर हे तापमान राखण्याचा प्रयत्न करत असते, यामुळे हार्ट बीट अधिक वाढतात.

यावेळी हृदयावर दबाव येतो. हार्ट बीट अचानक वाढल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. उन्हात अधिक काळ बाहेर राहिल्याने हार्ट अटॅक अधिक येतो. वयस्कर लोक आणि गर्भवती महिलांनी शक्यतो उन्हात जास्त बाहेर पडून नये. दिवसाला सात ग्लाॅस पाणी प्यावे. लिंबू पाण्याचा देखील समावेश करावा. शक्यतो उन्हात बाहेर पडताना पूर्ण काळजी घ्यावी.