युरिक एसिड वाढलंय ? या तीन चटण्या कामी येतील, वेदना आणि सूजेपासून होईल सुटका
युरिक ॲसिडची समस्या कमी करण्यासाठी काही चटण्या खूप फायदेशीर ठरू शकतात. या चटण्यांच्या रेसिपीवर एक नजर टाकूया:

उतारवयात युरिक एसिडची समस्या कॉमन झाली आहे. यामागे खराब जीवनशैली आणि चुकीचा आहार म्हटला जातो. या स्थिती सांध्यात क्रिस्टल जमतात. अशा स्थितीत सांध्यात खूप वेदना होतात. रुग्णांना उठता बसता अडचणी होतात. अशा वेळी औषधा सोबत आहारही महत्वाचा असतो. आपण अशा चटण्यांची रेसिपी पाहणार आहोत.
1. धने-पुदीन्याची चटणी –
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ही चटणी कामी येते. धन्यातील एंटीऑक्सिडेंट्स आणि पुदीन्यात सूज विरोधी गुण शरीरात जमलेले विषारी तत्वांना बाहेर काढतात. चटणी पचनाला चांगले करते. ज्यामुळे मेटाबॉलिझम योग्य प्रकारे काम करते. धनिया, पुदीना, आले आणि लिंबूचा रस आणि थोडेसे काळे मीठ मिक्स करुन चटणी तयार करता येतो. या चटणीला तुम्ही जेवनासोबत खाऊ शकता.
2. आले-लसूणाची चटणी –
आले आणि लसूणात एंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. विशेषज्ज्ञांच्या माहितीनुसार दोन्ही सामुग्री सांध्यात होणारी सूज आणि वेदना कमी करण्यास मदत मिळते. आल्यातील जिंजरॉल आणि लसूणात आढळणाऱ्या सल्फर यौगिक शरीराची सूजेला नियंत्रण करण्यास भूमिका निभावते. आले, लसूण,कोथिंबिर आणि थोडे लिंबू टाकून चटणी तयार करावी. ही चटणी चवी सोबतच आरोग्यदायी असते. पोटाचे विकार असतील तर ही चटणी कमी प्रमाणात खावी.
3. आळशी आणि टोमॅटो चटणी –
आळशीत ओमेगा – 3 फॅटी एसिडचा चांगला स्रोत मानला जातो. ओमेगा – 3 शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. टोमॅटोतील एंटीऑक्सीडेंट्स पेशींना नुकसान होण्यास वाचवते. आळशी आणि टॉमेटोची चटणी सांध्यातील असहजता कमी करण्यास मदत करते. भाजलेली आळसी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिर मिक्स करुन वाटण करावी. चटणी चविष्ट होते. या चटणीस चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता.
युरिक एसिडचा त्रास असेल तर औषधे घेणेही महत्वाचे आहे. त्यामुळे केवळ चटणी खाऊन युरिक एसिड बरा होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टारांच्या सल्ल्याने औषधे देखील घ्यावी लागतील.