जेवल्यानंतर किती वेळ चालण्याने शुगर होते कंट्रोल?, AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितला उपाय

नवी दिल्लीच्या AIIMS चे प्रोफेसर डॉ. राजेश खडगावत यांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीज रुग्णांना जेवनानंतर चालणे फायदेशीर असते. यामुळे शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते. मात्र, चालताना काही तत्वे पाळणे गरजेचे असते.

जेवल्यानंतर किती वेळ चालण्याने शुगर होते कंट्रोल?, AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितला उपाय
walk after a meal to control diabetes
| Updated on: Oct 21, 2026 | 3:35 PM

जेवल्यानंतर लोक थेट बिछान्यावर आडवे होतात, अथवा खुर्चीवर आराम करतात. काही लोक फिरायला जातात. परंतू जेवणानंतर नेमके केव्हा चालावे आणि किती वेळ चालावे याची माहिती असणे देखील गरजेचे आहे. खास करुन डायबिटीजच्या रुग्णांना जेवल्यानंतर चालणे फायदेमंद असते. यामुळे शरीराला अन्नातून मिळणारी शुगरचा वापर करण्यास मदत मिळते आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळू शकते.

या संदर्भात AIIMS नवी दिल्लीच्या एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ.राजेश खडगावत यांनी माहिती दिली आहे. डॉ. राजेश यांच्या मते जेवणानंतर चालल्याने शरीराला खूप फायदा होतो. कारणे जेवल्यानंतर शरीरातील शुगर लेव्हल वाढते, ज्याला तुम्ही चालून कंट्रोल करु शकता.

Loading...

जेवल्यानंतर किती वेळाने चालावे?

जेवणानंतर सुमारे १५ ते २० मिनिटांनी चालणे फायद्याचे असते. याच्यासाठी खूप वेगाने चालण्याची एक्सरसाईज करण्याची गरज नाही. सामान्य गतीने आरामात चालल्याने देखील फायदा होऊ शकतो. वास्तविक जेवल्यानंतर शरीरात ब्लड शुगरची पातळी वाढते. या दरम्यान चालण्याने स्नायू ग्लुकोजचा वापर करतात. यामुळे जेवल्यानंतर ब्लड शुगरमध्ये होणारी वाढ कमी करण्यास मदत मिळू शकते असे डॉ.राजेश खडगावत यांनी सांगितले.

अचानक वेगाने चालणे आणि हेव्ही वर्कआऊट टाळावा

डॉक्टर राजेश यांच्या मते जेवल्यानंतर अचानक खूप वेगाने चालणे वा हेव्ही वर्कआऊट करणे योग्य नाही. जर चालताना छातीत वेदना, चक्कर वा असामान्यपण दम लागणे अशा समस्या होत असतील तर थांबा आणि गरज लागण्यावर मेडिकल मदत घ्यावी. जर तुम्ही हार्टचे रुग्ण आहात किंवा तुम्हाला आधीपासूनच कोणता गंभीर आजार आहे. तर वॉक आणि एक्सरसाईजच्या योग्य पद्धत आणि वेळ जाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रोज 30 ते 35 मिनिटांचे वॉक

डॉ. राजेश खडगावत यांच्या मते सकाळी आणि सायंकाळी रोज ३० ते ३५ मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. नियमित वॉकने ब्लड शुगर कंट्रोल करणे, वजन नियंत्रित करणे आणि हृदयाच्या आरोग्य राखण्यासाठी यात मदत मिळते.

केवळ चालण्याने डायबिटीज संपूर्णपणे नियंत्रित होत नाही. यासाठी संतुलित आहार, चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे असते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर औषधोपचार करणे देखील गरजेचे असते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us