गॅसेस आणि ॲसिडिटीमध्ये काय आहे फरक ? जाणून घ्या घरगुती उपचारांची माहिती

| Updated on: Nov 21, 2022 | 4:23 PM

ॲसिडिटी व गॅसेस यामध्ये नेमका काय फरक आहे ? ते कशामुळे होतात ? त्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरी काय उपचार करता येतील याची माहिती जाणून घेऊया.

गॅसेस आणि ॲसिडिटीमध्ये काय आहे फरक ? जाणून घ्या घरगुती उपचारांची माहिती
Follow us on

नवी दिल्ली – जेव्हा शरीरात अतिप्रमाणात ॲसिडची (acid) निर्मिती होत तेव्हा ॲसिडिटीची (acidity) समस्या निर्माण होते. पोटात असणाऱ्या ग्रंथीद्वारे या ॲसिडची निर्मिती होते. ॲसिडिटी पोटात अल्सर, गॅस्ट्रिक सूज , हार्ट बर्न व अपचन अशा समस्या (health problems) उद्भवू शकतात. खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक हालचाल अथवा व्यायामाचा अभाव , मद्यपान, धूम्रपान, ताण, जंक फूड, अति मसालेदार (bad lifestyle, junk food) पदार्थ खाणे आणि चुकीच्या सवयी यामुळे ॲसिडिटीचा (causes of acidity) त्रास उद्भवू शकतो. अधिक मांस खाणे, मसालेदार व तेलकट, अतितिखट पदार्ख खाणे यामुळेही ॲसिडिटी होऊ शकते.

ॲसिडिटी काय करते?

हे सुद्धा वाचा

ॲसिडिटीमुळे शरीरात पीएचचं असंतुलन होतं. जेव्हा मूत्रपिंड आणि फुफ्फुसे शरीरातील अतिरिक्त आम्ल काढून टाकण्यास असमर्थ असतात तेव्हा सहसा ही परिस्थिती उद्बवते. त्यामुळे ॲसिडिटी होते.

ॲसिडिटीची कारणे

– मांसाहार करणे आणि मसालेदार अन्नाचे सेवन करणे.

– अतिताण

– जास्त प्रमाणात मद्यपान करणे.

– वारंवार धूम्रपान करणे.

– पोटात गाठ तयार होणे, गॅस्ट्रोओसोफेग रिफ्लेक्स रोग आणि अल्सर यासारखे पोटाचे विकार, यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.

 

कोणाला होतो ॲसिडिटीचा त्रास?

– जड जेवण करणारे लोक

– लठ्ठपणाची किंवा अतिरिक्त वजन असणारे लोक

– झोपण्यापूर्वी स्नॅक्स खायची सवय असणारे लोक

– चहा अथा कॉफीचे अति प्रमाणात सेवन करणारे लोक

 

ॲसिडिटी आणि गॅसेस यामध्ये काय फरक आहे ?

– ॲसिडिटी ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरामध्ये पचनासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते. ॲसिडिटी ही सहसा हार्ट बर्नसह होते.

– तर आपल्या कोलनमध्ये गॅस तयार होतो, जो पचनास मदत करतो. सामान्य व्यक्ती दिवसातून सुमारे 20 वेळा मलाशय किंवा तोंडातून गॅस सोडते.

– मात्र, अतिप्रमाणात अन्न जेवल्याने किंवा अति तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अतिरिक्त गॅस तयार होतो किंवा अडकतो, तेव्हा ढेकर मार्गे बाहेर पडतो.

– हे सौम्य स्वरूपात असते. मात्र कधीकधी वाढल्यास पोटात वेदना होऊ शकतात.

 

ॲसिडिटी कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

बदाम – हे पोटातील रसांना निष्प्रभ करते, पोटातील वेदना कमी करते आणि ॲसिडिटी पूर्णपणे थांबवते. जेव्हा तुम्हाला (ॲसिडिटीमुळे) एखादा पदार्थ खाणे शक्य नसेल तेव्हा बदाम चघळावा. जेवणानंनंतर ४ बदाम खावेत.

केळं आणि सफरचंद- केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटासिड्स असतात जे ॲसिडिटीशी लढतात. तसेच झोपण्यापूर्वी काही काळ आधी सफरचंद खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा रिफ्लेक्सपासून आराम मिळतो.

नारळाचे पाणी – ॲसिडिटीचा त्रास असल्यास नारळाचे पाणी प्यावे, आराम मिळतो.

पुरेशी झोप घेणे – प्रत्येक (प्रौढ) व्यक्तीने कमीत कमी 7 तासांची झोप घेतली पाहिजे. झोप पूर्ण न झाल्यास ॲसिडिटीचा त्रास वारंवार होऊ शकतो.