Sneezing : आपल्याला शिंक का येते, शिंकताना डोळे नक्की का बंद होतात ? जाणून घ्या थोडी रंजक माहिती

| Updated on: Feb 03, 2023 | 11:29 AM

शिंकताना कसं वाटतं, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. नाकात थोड्याफार गुदगुल्यांसारख्या संवेदना होतात आणि शिंक येते. पण आपण नेमकं का शिंकतो ? याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे नक्की वाचा...

Sneezing : आपल्याला शिंक का येते, शिंकताना डोळे नक्की का बंद होतात ? जाणून घ्या थोडी रंजक माहिती
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – कधी कधी सर्दीचे आगमन शिंकण्यावरून कळते. थंडी बाधली किंवा एखादा संसर्ग झाला हे देखील शिंकण्यावरून कळतं. तर पावसात भिजल्यावर शिंकलात की गरमागरम चहा प्यावासा वाटतो. म्हणजेच, शिंका येणे (Sneezing) हा शरीराचा एक सिग्नल (signal of body) आहे, जो वेगवेगळे संकेत देतो. पण प्रत्यक्षात आपल्याला शिंक का येते? हे जाणून घेताना काही रंजक तथ्यं (Facts about Sneezing)समोर आली.

शिंकण्याद्वारे, आपले नाक स्वतः स्वतःलाच साफ करण्याची प्रक्रिया करते. हवेतील धूळ, घाण, परागकण, किंवा धूर यांसारखे बाहेरचे पदार्थ आपल्या नाकपुड्यांमध्ये गेल्यास नाकात जळजळ होऊ शकते. हे जेव्हा होते, तेव्हा नाक साफ व्हावे, यासाठी आपल्याला शिंक येते. शिंक ही आपल्या शरीरातील बॅक्टेरियापासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. जेव्हा कोणतीही घाण किंवा बाहेरील पदार्थ नाकात प्रवेश करतो तेव्हा नाकातील नाजूक अस्तराला ते जाणवते, त्यानंतर आपल्या मेंदूला (त्यसंदर्भात) मेंदूला विद्युत सिग्नल (electric signal) पाठवला जातो. हा सिग्नल मेंदूला सांगतो की नाक साफ करणे आवश्यक आहे, परिणामी आपल्याला शिंक येते किंवा आपण शिंकतो.

यावेळी मेंदू आपल्या शरीराला सूचित करतो की शिंकण्याची वेळ आली आहे आणि आपलं शरीर शिंकण्यासाठी स्वतःला तयार करून प्रतिसाद देते. बहुतेक प्रकरणांमध्ये, शिंकताना डोळे जबरदस्तीने बंद होतात, जीभ टाळूला लागते आणि शिंकताना स्नायू आकुंचन पावतात. हे सर्व अवघ्या काही सेकंदात घडते.

हे सुद्धा वाचा

काय आहे मेडिकल टर्म ?

शिंकेला वैद्यकीय भाषेत स्टर्नटेशन (sternutation)म्हणून ओळखले जाते, यामुळे नाकातून पाणी, श्लेष्म (कफ) आणि हवा मोठ्या शक्तीने बाहेर काढते. शिंकासोबत अनेक जंतूही बाहेर पडतात, त्यामुळे फ्लूसारखे आजार पसरू शकतात. म्हणूनच आपण शिंकल्यानंतर तसेच दिवसभरातही आपले हात पाणी व साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत, असा सल्ला CDCने (Centers for Disease Control and Prevention) दिला आहे. विशेषतः बाथरूममध्ये जाऊन आल्यानंतर आणि कोणताही पदार्थ खाण्यपूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तुमच्याकडे साबण व पाणी उपलब्ध नसेल किंवा तुम्ही बाहेर असाल तर हँड सॅनिटायझर वापर करावा.

पण आपल्याला शिंक का येते ?

शिंक येणे ही शरीरात एक महत्त्वाची भूमिका बजावते. 2012 मध्ये, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की शिंक येणे हा नाकाचा “रीसेट” करण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. या अभ्यासात असे आढळूले आहे की सिलिया, नाकाच्या आतील टिश्यूंना(tissue)रेषा देणारी पेशी असून, शिंकामुळे रिबूट होतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक शिंक संपूर्ण नाकाचे वातावरण रीसेट करते. मात्र साइनसाइटिस सारख्या (नाकाशी संबंधित )समस्या असलेल्या लोकांवर शिंकामुळे होणारा “रीसेट”चा प्रभाव पडत नाही.

शिंकताना हृदयाची धडधड थांबते का?

जेव्हा आपल्याला शिंक येते तेव्हा हृदय काही काळासाठी धडधडणे थांबते, हा एक गैरसमज आहे की. खरंतर आपण जेव्हा शिंकतो तेव्हा आपल्या छातीतील दाब बदलतो. हे बदल रक्त प्रवाह बदलू शकतात, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्याची लय देखील बदलू शकते. त्यामुळे शिंकताना हृदय “धडकत नाही” असे वाटू शकते, पण हे काही खरं नाही.

शिंकताना नेहमी डोळे का बंद होतात ?

शिंकताना डोळे उघडे ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपला मेंदू आपले डोळे बंद करण्याचा संदेश पाठवतो. ही अशी क्रिया आहे, जी आपण इच्छा असूनही थांबवू शकत नाही.

शिंक रोखणे वाईट आहे का ?

जर तुम्हाला शिंक येत असेल आणि तुम्ही ती थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर तर तसे करू नका. शिंका शक्तिशाली असतात. यामुळे तुमच्या नाक, कान आणि डोळ्यांवर सर्वत्र दबाव पडतो, जर तुम्ही शिंक ब्लॉक केलीत तर त्यामुळे अनुनासिक मार्गावर दाब वाढू शकतो आणि त्यामुळे तुमचे डोळे, नाक किंवा कानाच्या पडद्यामधील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकते.