Men Health Care: पुरूषांमधील कॅन्सरचा धोका कमी करू शकतील ‘या’ टिप्स

| Updated on: Dec 15, 2022 | 4:33 PM

कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी लोकांच्या मनात भीती निर्माण होते.

Men Health Care: पुरूषांमधील कॅन्सरचा धोका कमी करू शकतील या टिप्स
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आजकालचे जीवन अतिशय धावपळीचे आणि तणावपूर्ण झालं (busy and stressful lifestyle) असून प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची पुरेशी काळजी घेता येणही अशक्य झालं आहे. महिलांप्रमाणेच पुरूषही खूप व्यस्त झाले असून त्यांचे आरोग्याकडे पुरेसे लक्ष नसते व ते अनेक आजार ओढवून घेतात. धूम्रपान (smoking) , खराब लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि मद्यपानाचे व्यसन यामुळे कॅन्सरसारखे (cancer) जीवघेण्या आजारांचा जन्म होतो. कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी लोकांच्या मनात भीती निर्माण होते.

आज काही अशा टिप्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका एका अंशी कमी होऊ शकतो.

प्रोस्टेट कॅन्सर

हे सुद्धा वाचा

हा पुरूषांमध्ये होणारा अतिशय कॉमन कॅन्सर कर्करोग आहे. दवाढत्या वयासह हा कॅन्सर होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे काही ठराविक महिन्यांनी यासंदर्भातील तपासणी करून घेतली पाहिजे.

कोलोरेक्टल कॅन्सर

हा कॅन्सरही पुरुषांमध्ये सामान्य मानला जातो. लठ्ठपणा, बिघडलेली जीवनशैली, लाल मांसांचे सेवन करणे, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन आणि कौटुंबिक इतिहास यांमुळे पुरुषांमध्ये या प्रकारचा कॅन्सर होतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, वयाच्या 45 व्या वर्षांनंतर या कॅन्सरची नियमित तपासणी मधे-मधे केली पाहिजे. या संदर्भातील स्क्रीनिंग चाचण्यांमध्ये स्टूल टेस्ट, कोलोनोस्कोपी आणि सीटी स्कॅन यांचा समावेश असतो.

फुफ्फुसांचा कॅन्सर

फुफ्फुसाचा कॅन्सर हा केवळ पुरूषानांच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीला होतो. एखादी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त धूम्रपान करत असेल तर त्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते. धूम्रपानाची सवय सोडल्यास किंवा कमी करून फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)