हा आजार थेट गुडघे आणि मणक्यावर ठरतो प्रभावी, जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Feb 16, 2024 | 6:51 PM

रीजनरेशन थेरपी नेमकी काय आहे? ऑस्टियोआर्थराइटिससाठी या आजारावर ही थेरपी परिणामकारक आहे. रीजनरेटिव्ह थेरपीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

हा आजार थेट गुडघे आणि मणक्यावर ठरतो प्रभावी, जाणून घ्या सविस्तर
Follow us on

मुंबई : ऑस्टियोआर्थरायटिस हा एक रोग आहे जो  सांध्यातील हाडांच्या र्‍हासामुळे तसेच हाडांच्या अतिवृद्धीमुळे उद्भवतो जो जगभरातील लाखो लोकांना होतो. ऑस्टियोआर्थरायटिस कोणत्याही सांध्यावर परिणाम करू शकतो, तो प्रामुख्याने हात, गुडघे आणि मणक्यावर परिणाम करतो. त्याच्या लक्षणांमध्ये सांधे कडक होणे, विशेषत: शारीरिक बसुन अथवा झोपून उठल्यानंतर अधिक त्रास होणे. याबाबत डॉ प्रमोद भोर, संचालक यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या लक्षणांमुळे दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण होतात. वेळीच उपचार न केल्यास ते कालांतराने आणखी त्रासदायक होऊ शकते. याव्यतिरिक्त, ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्या व्यक्तींना सांध्यामध्ये जळजळ झाल्यामुळे सांधे अधिक संव्दनशील होणे किंवा सांध्याना सूज येऊ शकते.

रिजनरेटिव्ह थेरपी

रीजनरेशन थेरपी हे वैद्यकशास्त्राचे एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे ज्याचे उद्दिष्ट शरीरातील नुकसान झालेल्या ऊती आणि अवयवांची दुरुस्ती करणे. स्टेम सेल थेरपी, टिश्यू इंजिनीअरिंग आणि ग्रोथ फॅक्टर स्टिम्युलेशन यासारख्या विविध पद्धतींचा वापर करून, रीजनरेशन थेरपीचा वापर अशा रुग्णांसाठी केला जातो ज्यांना पूर्वी उपचार करता येत नव्हते. हा थेरपी पाठीच्या कण्याला झालेली दुखापत, हृदयरोग, मधुमेह आणि हाडांची झीज होणे यासारख्या वैद्यकीय स्थितींवर उपचार करते. रीजनरेशन थेरपीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे केवळ बाह्य उपचारांवर अवलंबून न राहता शरीराच्या रीजनरेशन क्षमतेचा उपयोग करण्यावर लक्ष केंद्रित करणे.

स्टेम सेल इंजेक्शन्स आणि प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा (पीआरपी) थेरेपी सारख्या रीजनरेशन उपचारांनी, काही प्रकरणांमध्ये ऊतींच्या दुरुस्ती आणि दाह कमी करण्यात मदत झाली आहे. काही अभ्यासांनी आशादायक परिणाम दाखवले आहेत, परंतु रिजनरेशन थेरपी ही ऑस्टियोआर्थराइटिससाठी प्रभावी ठरतेय. ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्या काही रुग्णांसाठी रीजनरेशन थेरपी नक्कीच फायदेशीर ठरु शकते. री