Protein Powder : बॉडी करण्यासाठी प्रोटिन पावडर खाताय तर सावधान, पावडरींत आढळून आलेत 130 विषारी केमिकल्स, ही बातमी नक्की वाचाच..

| Updated on: May 09, 2022 | 8:01 PM

काही संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की प्रोटिन पावडर प्यायल्याने काही फायदे होत असले तरी त्याचे काही साईड इफेक्टही शरिरावर होतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अहवालानुसार, एका अभ्यासात 134 प्रोटिन पावडरमध्ये 130 प्रकारांचे धोकादायक विषारी केमिकल सापडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

Protein Powder : बॉडी करण्यासाठी प्रोटिन पावडर खाताय तर सावधान, पावडरींत आढळून आलेत 130 विषारी केमिकल्स, ही बातमी नक्की वाचाच..
जीम (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us on

मुबंईसध्या बाजारात प्रोटिन पावडर (Protein Powder) सप्लिमेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शरिरासाठी (Body) त्याचा वापर हेही सध्या सर्रास होताना दिसतो आहे. वजन कमी करण्यासाठी, मसल्स गेन करण्यासाठी याचा स्त्री आणि पुरुष या दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र या प्रोटिन पावडरींचा जास्त वापर हा आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या (Medical School) काही अहवालांत प्रोटिन पावडरमध्ये अतिरिक्त साखर आणि विषारी केमिकल्स असू शकतात, असे सांगण्यात आले आहे. फिटनेस इंडस्ट्रीत सर्वाधिक ज्या बॉडी बिल्डिंग सप्लिमेंटचा वापर होतो तो आहे प्रोटिन सप्लिमेंटचा. त्याला सामान्य भाषेत प्रोटिन पावडर म्हणून ओळखले जाते. प्रोफेशनल बॉडी बिल्डर असो वा सुरुवात करणारा, प्रत्येकजण व्यायाम झाल्यानंतर प्रोटिन पावडर पितो. काही संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की प्रोटिन पावडर प्यायल्याने काही फायदे होत असले तरी त्याचे काही साईड इफेक्टही शरिरावर होतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अहवालानुसार, एका अभ्यासात 134 प्रोटिन पावडरमध्ये 130 प्रकारांचे धोकादायक विषारी केमिकल सापडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

तज्ज्ञांचं काय म्हणणं

या विषयातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्रोटिन पावडरचा सर्रास उपयोग चुकीचा आहे. काही मोजक्याच परिस्थितीत आणि तेही तज्ज्ञ ड़ॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रोटिन पावडरचा उपयोग करण्यात येऊ नये.

काय असते प्रोटिन पावडर

प्रोटिन पावडर सप्लिमेंट ही पावडरच्या स्वरुपात असते. उदा. कैसीन, व्ही प्रोटिन, यात साखर, कृत्रिम गोडपणा, व्हिटामीन, मीनरल यांचा समावेश असतो. मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये एका स्कूपमध्ये 10 ते 30 ग्रॅम प्रोटिन असण्याची शक्यता असते.

हे सुद्धा वाचा

प्रोटिन पावडर घेण्याचे धोके

काही तज्ज्ञ न्यट्रिशियन्सच्या मते, प्रोटिन पावडरचा उपयोग जर कुणी करत असेल तर त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात. सप्लिमेंटमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्सचा डेटा तसा कमी आहे. मात्र तरीही प्रोटिन पावडरचे साई इफएक्ट्स होऊ शकत नाही, हे नाकारता येणा नाही. काही प्रोटिन पावडरमध्ये कमी साखर असते, तर काहींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. जास्त साखर नेहमीच शरिराचे नुकसान करते. या प्रोटिन पावडर्समध्ये अधिक कॅलरी असल्याने वजन वाढण्याचीही भीती असते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. अमेरिकेतील हार्ट असोसिएट्सने महिलांनी प्रति दिवशी केवळ 24 ग्रॅम तर पुरुषांनी प्रतिदिनी केवळ 36 ग्रॅम साखर खाण्याचा सल्ला दिला आहे.

प्रोटिन पावडरचा नवी जोखीम

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका अहवालानुसार, प्रोटिन पावडरमधील विषारी पदार्थांबाबत 2020 मध्ये एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यात 134 प्रोटिन पावडरमध्ये 130 विषारी पदार्थ असल्याचे समोर आले होते. या अहवालानुसार अनेक प्रोटिन पावडरमध्ये धातू ( पारा, शिसे), प्लास्टिक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे बिस्फेनॉल, कीटकनाशक आणि असे धोकादायक केमिकल असतात.

या केमिकल्समुळे मोठ्या आजारांचा धोका

या केमिकल्समुळे कॅन्सर आणि इतर मोठ्या आजारांचा धोका होण्याची शक्यता असते. सगळ्याच प्रोटिन पावडर घातक असतात असे नाही, मात्र त्यात नेमका कशाचा वापर करण्यात येतो यावर हे अवलंबून आहे.

प्रोटिन पावडर घ्यावी की नाही

नेहमीच केमिकल फ्री प्रोटिन पावडर घ्यायला हवी असे न्यूट्रिशियन्स सांगतात. कोणत्याही डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय प्रोटिन पावडर घेऊ नका असाही सल्ला देण्यात आला आहे. प्रोटिन सल्पिमेंट घेण्यापेक्षा प्रोटिन देणारे पदार्थ अंडे, काडू, मास, दही, डाळ, मासे, पनीर यांचा वापर केला तर ते जास्त आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञ सांगतायेत.