AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी या पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाली असेल तर भूक न लागणे, अशक्तपणा, केस गळणे, बद्धकोष्ठता (Constipation) ही प्रमुख लक्षणे प्रामुख्याने दिसतात. असे बरेच शाकाहारी पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने त्याची कमतरता भरून काढता येते. चला तर मग जाणून घेऊयात शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणाऱ्या पदार्थांबद्दल.

Health | शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी या पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 8:23 AM
Share

मुंबई : शरीराला निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, कार्ब्स यांचा यामध्ये समावेश होतो. त्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12 हे देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असते. हे जीवनसत्व शरीरात लाल रक्तपेशी (Red blood cells) तयार होण्यास मदत करते. तसेच हृदयासाठी देखील हे फायदेशीर असते. जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाली असेल तर भूक न लागणे, अशक्तपणा, केस गळणे, बद्धकोष्ठता (Constipation) ही प्रमुख लक्षणे प्रामुख्याने दिसतात. असे बरेच शाकाहारी पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने त्याची कमतरता भरून काढता येते. चला तर मग जाणून घेऊयात शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणाऱ्या पदार्थांबद्दल.

सोयाबीन

जर तुम्ही मांसाहाराशी संबंधित इतर गोष्टी खाऊ शकत नसाल तर त्याऐवजी सोयाबीन खा. त्यात व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असते. तुम्ही जेवणामध्ये सोयाबीनची भाजी, सोया दूध किंवा सोयाबीन तेल वापरू शकता, सोयाबीनमध्ये प्रथिने देखील असतात. यामुळेच आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करा.

ओट्स

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ओट्स खाणे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी-12 असते. तुम्ही ओट्सची स्मूदी बनवून त्याचे सेवन करू शकता, खास गोष्ट म्हणजे हेल्दी आणि चविष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यातही मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी तर आपल्या आहारामध्ये नक्कीच ओट्सचा समावेश करावा.

चीज

व्हिटॅमिन बी 12 व्यतिरिक्त यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम देखील योग्य प्रमाणात असते, ज्या लोकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे, ते चीज, तसेच कॉटेजद्वारे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करून ते आपल्याला निरोगी ठेवण्यासही मदत करते.

मशरूम

मशरूम हे व्हिटॅमिन बी 12 चा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. मशरूममध्ये व्हिटॅमिन बी 12 सोबत प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तुम्ही मशरूमपासून बनवलेली भाजी तुमच्या आहाराचा घेऊ शकता. तसेच आपण सलाडमध्येही मशरूमचा नक्कीच समावेश करू शकता.

तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.