Beauty Tips : पाठीवरच्या डागांनी त्रस्त आहात? फक्त ‘या’ तीन गोष्टी करा आणि फरक अनुभवा…

पाठीवर असलेल्या पिंपल आणि त्याच्या डागांमुळे त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत. आज आपण त्यासाठीच्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

Beauty Tips : पाठीवरच्या डागांनी त्रस्त आहात? फक्त 'या' तीन गोष्टी करा आणि फरक अनुभवा...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 08, 2022 | 7:05 AM

मुंबई : चेहऱ्यावर पिंपल्समुळे (Pimples) अनेक तरूणी त्रस्त आहेत. त्यामुळे अनेकदा कॉफिडन्सही कमी होतो. काही तरूणींना तर गंभीर पिपल्सची समस्या जाणवते. पाठीवर असलेल्या पिंपल आणि त्याच्या डागांमुळे त्यांच्या आवडीचे कपडे घालता येत नाहीत. तरूणींना अधिक फॅन्सी कपडे घालण्याची आवड असते मात्र पिंपलमुळ त्यांना घालता येत नाहीत. काहीवेळा पाठीवर पिंपल्स येऊ लागतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे अनेकांना त्रास होतो. या फोडांमुळे खाज सुटते. त्यामुळे काही घरगुती उपाय (Home remedies) करता यावेत अशी अनेकांच्या मनात इच्छा असते. आज आपण त्या घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

अॅलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. पाठीवरील पुरळ दूर करण्यासाठीही अॅलोवेरा जेलचा वापर केल्यास तो फायदेशीर ठरेल. अर्धा तास अॅलोवेरा जेल लावून ठेवा. मग पाण्याने धुवा. फरक जाणवेल.

मध आणि दालचिनी मिक्स करून फेस पॅक तयार करा. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या या लेपमध्ये गुणधर्म आहेत. जे फोड आणि मुरुम दूर करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा मध आणि दालचिनी पावडर मिसळा आणि 15 मिनिटे पाठीला लावा. नंतर तो धुवून टाका.

ग्रीन टीचा वापर अनेकदा वजन कमी करण्यासाठी केला जातो, परंतु त्यामुळे पिंपलवरची चांगला परिणाम होतो. एक कप ग्रीन टी तयार करा, आता त्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवा. तुम्हाला फरक जाणवेल.

टीप- आम्ही केवळ आपल्यासाठी उपयुक्त असणारी माहिती पुरवत आहोत. पण वरील गोष्टींचा अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें