AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK IPL 2026 : चेन्नई 19 व्या मोसमासाठी सज्ज, संजू सॅमसन खेळणार, यलो आर्मीचा पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

Chennai Super Kings IPL 2026 1st Phase Schedule : सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्स यंदा वर्ल्ड कप चॅम्पियन संजू सॅमसन याच्यासोबत आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळणार आहे.जाणून घ्या सीएसकेचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक.

CSK IPL 2026 : चेन्नई 19 व्या मोसमासाठी सज्ज, संजू सॅमसन खेळणार, यलो आर्मीचा पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक
CSK MS Dhoni IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 13, 2026 | 1:05 AM
Share

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) या टी 20i स्पर्धेचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेतील 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या टप्प्याला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचं 11 मार्च रोजी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 20 सामन्यांमध्ये 4 दिवस डबल हेडरचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

संजूची सीएसकेत एन्ट्री

यंदा 19 व्या हंगामात मिनी ऑक्शननंतर प्रत्येक संघात काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहे. त्यानुसार आयपीएलमधील संयुक्तरित्या सर्वात यशस्वी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स या टीमचं 19 व्या मोसमापासून संजू सॅमसन प्रतिनिधित्व करणार आहे. संजूने टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे संजू सीएसकेकडून पदार्पण केल्यानंतर कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवा आयुष म्हात्रे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या कामगिरीकडेही थाला चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने यलो आर्मीचं या पहिल्या टप्प्यात एकूण किती सामने होणार? हे आपण जाणून घेऊयात.

चेन्नईचे पहिल्या फेरीत 4 सामने

चेन्नई पहिल्या टप्प्यात साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळणार आहे. सीएसके या 4 पैकी2 सामने आपल्या घरच्या मैदानात अर्थात एमए चिदंबरम स्टेडियमध्ये खेळणार आहे. तर चेन्नईला 2 सामने हे प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडमध्ये खेळावे लागणार आहेत.

चेन्नईच्या पहिल्या फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 30 मार्च, गुवाहाटी

दुसरा सामना, विरुद्ध पंजाब किंग्स, 3 एप्रिल, चेन्नई

तिसरा सामना, विरुद्ध आरसीबी, 5 एप्रिल, बंगळुरु

चौथा सामना, विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, 11 एप्रिल, चेन्नई

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हीस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल, अकील होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेनरी, राहुल चाहर आणि जॅक फोक्स.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...