AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल

Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Nov 07, 2026 | 8:29 AM
Share

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सामना वृत्तपत्राने भाजप सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. भाजपने पराभव पचवला नसल्याचा आरोप करत, "हा रडीचा डाव जनता उधळून लावेल," असे सामनामध्ये म्हटले आहे. सत्तेसाठी भाजप लाचार आणि हिंसक झाल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. पराभूत उमेदवारांना परत आणण्याचा खटाटोप सुरू असल्याचेही सामनाने म्हटले आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव भाजपला पचवता येत नाही, असा गंभीर आरोप सामना वृत्तपत्राने केला आहे. सामनाने सरकारवर निशाणा साधत, “हा रडीचा डाव जनता उधळून लावेल,” असे म्हटले आहे. तसेच, हसन मुश्रीफ भाजपच्या तंबूमध्ये शिरल्यामुळेच त्यांना ईडीने क्लीन चिट दिली, असा दावाही सामनातून करण्यात आला आहे.

आताच्या भाजपने संपूर्ण गोकुळवरच दरोडा टाकला असून, या दरोड्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली आहे, असे सामनाने म्हटले आहे. बहुमताच्या पॅनलला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी नव्या क्लृप्त्या सुरू केल्या आहेत. “लोकांनी आम्हाला हरवले तरी आम्ही सत्ता सोडणार नाही,” असा त्यांचा हट्ट आहे. 2024 च्या लोकसभा-विधानसभेतही हे लोक हरले होते. भाजपचे मानसिक संतुलन बिघडले असून, सत्तेसाठी ते इतके लाचार आणि हिंसक झाले आहेत की, एका दूध संघातील पराभवसुद्धा त्यांना पचवता येत नाही, अशी टीकाही सामनाने केली. जनतेने ज्यांना पराभूत करून घरी बसवले, अशा नावेद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांच्यासारख्यांना पुन्हा संचालक मंडळामध्ये आणण्याचा हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

Published on: Nov 07, 2026 08:29 AM

Follow Us