AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला पडलेले दोन प्रश्न… पवार भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? राऊत काय म्हणाले?

"शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही," असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे ते म्हणाले. अजित पवार गटातील असंतोष आणि पार्थ पवारांच्या वाढत्या प्रभावामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना बळ मिळाल्याचे राऊतांनी सूचित केले.

महाराष्ट्राला पडलेले दोन प्रश्न... पवार भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? राऊत काय म्हणाले?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 10:56 AM
Share

शरद पवार एनडीएत जाणार का? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? महाराष्ट्रात सध्या या दोन प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण त्यावर आपआपल्या पद्धतीने तर्क लढवत आहे. पण ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवार भाजपसोबत कधीच जाणार नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊत यांनी थेट भाष्य केलं नाही. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या पक्षाविषयी सातत्याने बातम्या पेरल्या जात आहे. जाणूनबुजून चर्चा घडवली जात आहे. पंतप्रधानांचा फोन आला. आपण एकत्र मिळून देश सांभाळू, असं मोदी म्हणाले. मग मिळून देश चालवायचा होता तर आमचे पक्ष का फोडले? राष्ट्रवादी का फोडली? शिवसेना का फोडली? या सर्व बातम्या निरर्थक आणि दुर्लक्षित कराव्या असाव्या अशा आहेत. पवार हे इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ आहेत. ते तसेच राहतील. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी त्यांच्या पुरोगामी विचारधारेत गडबड होणार नाही. इतक्या वर्षात झाली नाही. यापुढे होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून…

काल मी शरद पवार यांना भेटलो. चर्चा करू अशी त्यांची प्रकृती नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पक्षाविषयी ज्या बातम्या सुरू आहेत. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. अजितदादा गटाच्या महायुतीत अडचणी आहेत. त्यांना मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे त्यांना पवारांच्या नेतृत्तवात काम करायचे आहे. त्यांना सोबत घ्यायचे की नाही हा पवारांचा निर्णय आहे. तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून पवार दुसऱ्या प्रवाहात जाणार नाहीत, असं राऊत यांनी स्पष्ट केले.

त्यांचं तिथं बरं नाही

विलिनीकरणावर अजितदादांच्या गटातूनच परस्पर विधाने केली जात आहेत. ते जिथे आहेत, तिथे त्यांचं काही बरं नाही. फक्त हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेलांवरच्या केसेस निघून गेल्या. पटेलांची संपत्ती मोकळी झाली. काही लोकांना फायदा झाला. पण इतर लोकांना झाला नाही. काही लोक पक्षात पदावर आहेत. पण सर्व सूत्रं पार्थ पवार यांच्या हाती आहे. पार्थ पवार नेते आहेत. त्यांना पार्थ पवारांच्या सोबत काम करावे लागत आहे., असं ते म्हणाले.

पार्थ पवार तरुण नेते

पार्थ पवार त्यांना विचारात घेत नसतील, पण ते त्यांच्या पद्धतीने ते पक्ष पुढे नेत आहेत. तरुण नेते आहेत. पक्ष चालवण्यासाठी त्यांच्या काही दिशा आणि संकल्पना असू शकतील. त्यांना नव्या पिढीला संधी द्यायची असेल. त्यांना त्यांच्या पद्धतीने पक्ष चालवण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.

पवार पूर्णवेळ राजकारणी

प्रफुल्ल पटेल पवारांना भेटले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शरद पवार हे पूर्णवेळ राजकारणी आहेत. गेली 60 वर्ष ते राजकारण आणि समाजकारण करत आहेत. काल पवारांना भेटायला जयंत पाटील आले होते. बाळासाहेब थोरात होते. अदानी होते. त्यामुळे विविध विषयावर चर्चा होत असते, असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?