AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात खळबळ, चीनने वाढवले जगाचे टेन्शन, भारताला मोठा धोका, थेट दररोज 100 चिनी जहाजे..

चीन मागील काही दिवसांपासून समुद्रात सतत आपली ताकद वाढवत आहे. त्यातच आता चीनमुळे अमेरिकेची चांगलीच मोठी डोकेदुखी वाढली आहे. चीन आपली सैन्य ताकद समुद्रात वाढवताना दिसत आहे. इतर देशांवर चीन दबाव टाकत आहे.

समुद्रात खळबळ, चीनने वाढवले जगाचे टेन्शन, भारताला मोठा धोका, थेट दररोज 100 चिनी जहाजे..
China
| Updated on: Nov 07, 2026 | 10:41 AM
Share

चीन गेल्या काही दिवसांपासून आपली सैन्य ताकद मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. आशियातील सागरी मार्गांवर दररोज सुमारे 100 चिनी नौदलाची जहाजे कार्यरत असतात. चीनची वाढणारी समुद्री ताकद अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी बनलीये. चीन सतत आपली ताकद वाढवत असल्याने अमेरिकेच्या सैन्य तज्त्रांनी मोठी चिंता व्यक्त केली. चीन हा जहाजांमध्ये अमेरिकेच्याही पुढे निघून गेला. मिडिया रिपोर्टनुसार, चीनजवळ 400 पेक्षा अधिक युद्धनाैका आणि पाणबुडी आहेत. अमेरिकेपेक्षा 35 टक्क्यांनी जहाज निर्मितीमध्ये पुढे गेला. याचे कारण म्हणजे जहाज उद्योग चीनमध्ये प्रचंड वाढला. चीन हा जगातील सर्वात मोठा जहाज तयार करणारा देश बनला आहे. इथे मोठ्या प्रमाणात जहाज मिळतात. अत्याधुनिक जहाजा चीन तयार करतो.

चीनची नौदल जहाजे दक्षिण चीन समुद्र, तैवानच्या आसपास, फिलीपिन्सच्या पूर्वेकडील जलक्षेत्रात आणि जपानच्या दक्षिण किनारपट्टीजवळ सक्रिय आहेत. प्रशांत महासागरातही चीन आपला दबाव वाढवत आहे.यासोबतच अदनच्या खाडीतही त्यांनी ताकद वाढवली. तायवानच्या अधिकाऱ्याने शेअर केलेल्या नकाशानुसार, 53 चीनी जहाज तिथे दिसले आहेत.

यात 34 नौदल युद्धनौकांचा समावेश होता. विमानवाहू युद्धनौका लिओनिंग आणि तिच्यासोबतची इतर जहाजे फिलीपिन्सच्या पूर्वेला तैनात करण्यात आली. तीन जहाजे जपानच्या दक्षिण समुद्राच्या आसपास दिसली गेली आहेत. जपानी संरक्षण अधिकाऱ्यांनी तीन चिनी युद्धनौका आणि एका तटरक्षक जहाजावरही लक्ष ठेवले. ओसुमी सामुद्रधुनीतून पॅसिफिक महासागराच्या दिशेने जात होती.  प्रशांत महासागरात चीनकडून युद्धभ्यासही करण्यात आला. चीनची वाढती ताकद अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.

तैवान आणि दक्षिण चीन समुद्रावरून या प्रदेशात तणाव वाढत असतानाच, चीनची वाढती सागरी ताकद समोर आली आहे. चीन आणि जपानमधील संबंधही तणावपूर्ण आहेत. त्यातच आता अमेरिकेचेही टेन्शन वाढले आहे. भारत आणि चीनमधील संबंध सध्या चांगली आहेत. दोन्ही देशातील संबंध सुधारली आहेत. पण काही सीमेच्या मुद्द्यावरून दोन्ही देशात तणाव बघायला मिळतोय. अरूणाचल प्रदेशातील काही भागात सीमेवर तणाव वाढला आहे.

Follow Us
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा