AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! जमिनीची नोंद अन्…थेट शासनाकडून परिपत्रकच जारी

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. यासाठी थेट शासनाकडून परिपत्रकच जारी करण्यात आलाय.

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! जमिनीची नोंद अन्...थेट शासनाकडून परिपत्रकच जारी
fadnavis news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 10:40 AM
Share

राज्यात फडणवीस सरकारने अॅग्रीस्टॅकने अंतर्गत मोठा निर्णय घेतलाय. अग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. जमिनीची नोंद किंवा लागवडीची माहिती उपलब्ध नसल्याने काही शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित आहेत. अशा वंचित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.  जाणून घ्या नेमका सरकारने कोणता निर्णय घेतला.

महायुती सरकारच्या निर्णयानंतर तलाठी, मंडळ अधिकारी  व तहसीलदारांच्या अभिलेख पडताळणीनंतर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर सरकारी योजनांचे लाभ, अनुदान, पीक कर्ज, पीकविमा, डिजिटल कृषी सेवा हे सर्वच शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता त्यानुसार नवीन कार्यपद्धतीचं परिपत्रक महसूल विभागाने जारी केलंय. अॅग्रीस्टॅक वापरादरम्यान काही अपवादा‍त्मक प्रकरणांमध्ये फार्मर आयडी जारी करण्याचं ठरवण्यात आलंय.  राज्यातील जे शेतकरी 1 जानेवारी 2015 आधी शेती कसत होते. आजही ती शेती शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. त्याबाबतचा एक तरी पुरावा शेतकऱ्याकडे आहे, असे शेतकरी, करार शेती करणाऱ्या व्यक्ती. शासनाकडून जमीन वाटप झालेल्या पात्र व्यक्ती आणि या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केलेली अन्य समतुल्य अपवादा‍त्मक प्रकरणातील शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी दिला जाणार आहे.

फार्मर आयडी कसा जारी केला जाणार?

तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार या तीन पातळीवर तपासणी केली जाईल. त्यानंतर शेकऱ्यांना फार्मर आयडी जारी केले जातील. तलाठी हे प्रणालीमध्ये माहिती नोंदविण्यापूर्वी संबंधित गावातील उपलब्ध जुने व अद्ययावत महसुली अभिलेख, जमीन महसूल भरल्याबाबतच्या पावत्या, इनाम नोंदवही, सनद, भाडेपट्टा किंवा करारपत्र, जमीन मंजुरी आदेशाची तपासणी होईल. तसेच अधिकृत अभिलेखांची सखोल तपासणी करावी लागेल. या तपासणीसाठी आधारभूत असलेल्या संबंधित अभिलेखांच्या प्रती प्रणालीमध्ये अपलोड कराव्या लागतील. तसेच शेतकऱ्यांची यादी तलाठ्याला चावडीवर प्रसिद्ध करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडल अधिकारी पडताळणी आणि तपासणी केली जाईल. तहसीलदारांकडून तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी देखील केली जाईल. पुढे तहसीलदारांनी मान्यता दिल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतहिश्याचा फार्म आयडी दिला जाईल.

Follow Us
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा