Love Life: दोन मुलांच्या बापाशी लग्न पण स्वतः आई झाली नाही; अभिनेत्रीने कुत्रे आणि कासवांनाच दिलं लेकरांचं प्रेम!
Love Life: सध्या अशा अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगली आहे, जिने विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या निर्मात्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीने कधीच स्वतःच्या मुलांना जन्म दिला नाही. तिने कुत्रे आणि कासवांनाच लेकरांचं प्रेम दिलं...

Love Life: बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयु्ष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एक अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आज वयाच्या 59 व्या वर्षी अभिनेत्री नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण तिला कधी मातृत्वाचं सुख अनुभवता आलंच नाही. सांगायचं झालं तर, अभनेत्रीने विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या निर्मात्यांसोबत लग्न केलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री भावना बलसावर आहे. भावना अनेक वर्ष निर्माता करण शाह याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, त्यानंतर दोघांनी देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत भावना म्हणाली, ‘आम्ही दोघे सुरुवातीला फक्त चांगले मित्र होतं. त्यानंतर आमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण तोपर्यंत मला माहिती नव्हतं की, करण विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहे. काही दिवसांनंतर त्याने स्वतः मला त्याच्या कुटुंबियांबद्दल सांगितलं. एवढंच नाही तर, त्याने अनेक महिलांसोबत अफेअर होतं, असं देखील त्याने सांगितलं…
‘असं असताना देखील आमच्या नात्याला काही झालं नाही, दिवसागणिक आमचं नातं आणखी घट्ट झालं. त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न देखील केलं. पण आधी लग्न करण्याचा आमचा कोणताच विचार नव्हता. पण आमचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही कधीच आमच्या मुलांचा विचार केला नाही.’
पुढे भावना म्हणते, ‘वय पाहता मी फार उशीरा लग्न केलं. त्यामुळे मला मुलांची जबाबदारी देखील नको होती. नवऱ्याला पहिल्या लग्नापासून दोन मुलं होती. त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. आम्ही फक्त आनंदी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला… आम्ही कधीच कोणाता तणाव घेतला नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
भावना हिने यासोबतच पुढे सांगितलं की, “मी प्राणी आणि निसर्गावर खूप प्रेम करणारी व्यक्ती आहे. माझं बालपणच कुत्र्यांच्या सहवासात गेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या मुलांचा विचार कधी माझ्या मनात आलाच नाही. असा एक काळ होता जेव्हा माझ्याकडे 7 कुत्रे होते, आता ३ आहेत. सध्या माझ्याकडे माशांनी भरलेलं एक तळं आहे आणि 2 कासव आहेत. माझ्याकडे खारुताईसुद्धा राहिल्या आहेत. मला निसर्गाची आणि प्राण्यांची खूप आवड आहे, तसंच माझ्याकडे खूप झाडं देखील आहेत.” भावनासाठी हे सर्व तिच्या स्वतःच्या मुलांसारखेच आहेत.
सांगायचं झालं तर, भावना या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या कन्या आहेत, तर ‘शोले’ सिनेमातील ‘कालिया’ म्हणजेच विजू खोटे हे तिचे मामा लागतात. त्यामुळे तिचं चित्रपटसृष्टीशी खूप घट्ट नातं आहे. भावना हिने ‘देख भाई देख’, ‘गुटर गू’, ‘जबान संभालके’ यांसारख्या मालिकेत तिने काम केलं. भावना आता 59 वर्षांची आहे. सध्या सर्वत्र भावना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
