AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : संजू सॅमसन-रवींद्र जडेजा ट्रेडवर सीएसकेकडून पहिली प्रतिक्रिया, त्याच्यासाठी आम्ही…

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोचा पर्याय खुला आहे. त्यामुळे फ्रेंचायझी आवश्यक खेळाडूच्या ट्रेडसाठी प्रयत्नशील आहेत. सीएसके फ्रेंचायझी संजू सॅमसनसाठी प्रयत्नशील आहे. याप्रकरणी सीएसकेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

IPL 2026 : संजू सॅमसन-रवींद्र जडेजा ट्रेडवर सीएसकेकडून पहिली प्रतिक्रिया, त्याच्यासाठी आम्ही...
IPL 2026 : संजू सॅमसन-रवींद्र जडेजा ट्रेडवर सीएसकेकडून पहिली प्रतिक्रिया, त्याच्यासाठी आम्ही...Image Credit source: PTI
| Updated on: Nov 10, 2025 | 7:57 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मिनी लिलावापूर्वीच फ्रेंचायझींमध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यापूर्वी संजू सॅमसनबाबत बरीच चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ही ट्रेड जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सकडून अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलं आहे. फ्रेंचायझीने संजू सॅमसनला संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.पीटीआयच्या वृत्तानुसार, सीएसकेने संजू सॅमसनबाबत सांगितलं की, सर्वांना माहिती आहे की आम्ही संजू सॅमसनला विकत घेण्यास उत्सुक आहोत. आम्ही ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सने अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. कारण त्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं की, ते पर्यायांवर विचार करत आहेत. आम्हाला आशा आहे की संजू सीएसकेकडून खेळेल.

चेन्नई सुपर किंग्सच्या स्पष्टीकरणानंतर फ्रेंचायजी संजू सॅमसनला संघात घेण्यास इच्छुक असल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजाला संघात घेण्याची इच्छा राजस्थान रॉयल्सने वर्तवल्याचं बोललं जात आहे. पण या बाबत दोन्ही फ्रेंचायझींचं एकमत होतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, रिटेन्शन यादी सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. बीसीसीआयने रिटेन्शनाबाबतची शेवटची तारीख नोव्हेंबर निश्चित केली आहे.

संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स हे समीकरण गेल्या आठ वर्षांपासून आहे. 2018 पासून त्याच्याकडे राजस्थान रॉयल्स संघाची धुरा आहे. त्याच्या कारकि‍र्दीत राजस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र जेतेपद मिळवण्यात अपयश आलं. 2018 पूर्वी संजू सॅमसन राजस्थानकडून 2013 ते 2015 या कालावधीत खेळला होता. संजू सॅमसन आतापर्यंत 177 आयपीएल सामने खेळला आहे. त्याने 30.94 च्या सरासरीने 4704 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.