AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेन्नई सुपर किंग्सने टाकलेले फासे गुजरात टायटन्सपुढे फुसsss, स्टार खेळाडू आता मिळणार नाही

चेन्नई सुपर किंग्ससाठी मागची दोन पर्व काही खास गेली नाहीत. त्यामुळे नव्या पर्वात नव्याने संघ बांधणीचा चंग फ्रेंचायझीने बांधला आहे. यासाठी खेळाडूंची देवाणघेवाण सुरु आहे. मात्र असं असताना गुजरात टायटन्सने सीएसकेची ऑफर नाकारली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने टाकलेले फासे गुजरात टायटन्सपुढे फुसsss, स्टार खेळाडू आता मिळणार नाही
चेन्नई सुपर किंग्सने टाकलेले फासे गुजरात टायटन्सपुढे फुसsss, स्टार खेळाडू आता मिळणार नाहीImage Credit source: PTI
| Updated on: Nov 10, 2025 | 5:54 PM
Share

आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी जितके चांगली खेळाडू संघात घेता येतील तितका प्रयत्न फ्रेंचायझी करत आहेत. ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू घेणं सोपं पडतं. पण लिलावात त्याच खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते. त्यामुळे फ्रेंचायझी आवडत्या खेळाडूसाठी ट्रेंड विंडोच्या माध्यमातून फासे टाकतात. चेन्नई सुपर किंग्स नव्याने संघ बांधणीसाठी प्रयत्न करत आहे. मागच्या दोन पर्वात संघाची कामगिरी फार काही चांगली झाली नाही. त्यामुळे संघाचा समतोलपणा राखण्यासाठी काही खेळाडूंची गरज फ्रेंचायझीला आहे. त्यासाठी धडपड सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्सची नजर राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनवर आहे. यासाठी रवींद्र जडेजा आणि सॅम करनला सोडण्याची तयारी असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या एका खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्सने फासे टाकले होते. पण चेन्नई सुपर किंग्सच्या प्रस्तावाला गुजरात टायटन्सने केराची टोपली दाखवली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्यासाठी ट्रेड विंडोचं दार ठोठावलं होतं. गुजरात टायटन्सला प्रस्ताव दिला होता. मात्र गुजरात टायटन्सने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. वॉशिंग्टन सुंदर सध्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियात टी20 मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. इतकंच टीम इंडियात तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो आणि त्याचा आयपीएल रेकॉर्डही चांगला आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला मेगा लिलावापूर्वी रिलीज केलं होतं. तेव्हा गुजरात टायटन्सने 3.2 कोटी मोजून त्याला संघात घेतलं. आता त्याला सोडण्याची इच्छा गुजरात टायटन्सच्या मनात नाही.

वॉशिंग्टन सुंदरचा आयपीएल प्रवास

वॉशिंग्टन सुंदरने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून आयपीएलचा प्रवास सुरु केला. त्यानंतर चार वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला. सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेतला. आता गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. वॉशिंग्टन सुंदर आतापर्यंत 66 आयपीएल सामने खेळला आहे. यात 7.69 च्या इकोनॉमी रेटने 39 विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी 511 धावा केल्या आहे. मागच्या पर्वात त्याने चांगली फलंदाजी केली होती. पाच डावात 133 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 166.25 चा होता. इतकंच काय तर वॉशिंग्टन सुंदर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची ताकद ठेवतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...