AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण कशी होते? काय आहेत नियम जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी ट्रेड विंडोची चर्चा सुरु आहे. कारण मिनी लिलावापूर्वी फ्रेंचायझींकडे खेळाडूंची अदलाबदल करण्याची एक संधी असते. सध्या संजू सॅमसनबाबत तसंच काहीसं घडत आहे. पण यासाठी काय नियम आहेत ते जाणून घ्या.

आयपीएल ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण कशी होते? काय आहेत नियम जाणून घ्या
आयपीएल ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण कशी होते? काय आहेत नियम जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Nov 10, 2025 | 5:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मागच्या पर्वात झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी खेळाडूंची देवाणघेवाण तसेच मिनी लिलावात काही खेळाडूंवर डाव टाकण्यास सज्ज आहेत. मिनी लिलावापूर्वी फ्रेंचायझींसाठी ट्रेंड विंडोची दारं खुली आहेत. या माध्यमातून फ्रेंचायझी खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. फक्त दोन्ही फ्रेंचायझींची सहमती झाली तर खेळाडूंची अदलाबदल करण्याचा मार्ग मोकळा होता. मग तो एखाद्या खेळाडूच्या बदल्यात असेल किंवा पैशांच्या रुपात असेल. म्हणजेच एखादा खेळाडू थेट लिलावातून न घेता थेट फ्रेंचायझीकडून घेण्याची संधी ट्रेड विंडोच्या माध्यमातून असते. ट्रेड विंडो आयपीएल स्पर्धेचं पर्व संपलं की सात दिवसांनी उघडते आणि लिलावापूर्वी सात दिवसांआधी बंद होते. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या ट्रेड विंडो होण्याची शक्यता आहे. पण खेळाडूच्या सहमतीशिवाय ट्रेड होऊ शकत नाही. कारण त्याचं मत सर्वोतोपरी असतं. दुसरीकडे, खेळाडूला संघ सोडायचा असेल तर संघाची परवानगी आवश्यक असते. दोन खेळाडूंची अदलाबदल होत असेल आणि त्यांची रक्कम वेगवेगळी असेल. तर जास्त कमाई असलेल्या खेळाडूची वरची रक्कम ही सदर फ्रेंचायझीला द्यावी लागते.

ट्रेड विंडोतील तीन महत्त्वाच्या गोष्टी

कॅशलेस स्वॅप : ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन संघ कोणत्याही रोख व्यवहाराशिवाय खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. म्हणजेच एका खेळाडूच्या बदल्यात दुसरा खेळाडू.. सध्या सुरु असलेल्या चर्चांमधून ही बाब तुम्हाला लक्षात येईल. चेन्नई सुपर किंग्सला संजू सॅमसन हवा आहे. यासाठी रवींद्र जडेजाला देण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यात दोन्ही खेळाडूंची किंमत 18 कोटी आहे. त्यामुळे करार झाला तर अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.

कॉन्ट्रॅक्ट वॅल्यू ट्रान्सफर : एखादी फ्रेंचायझी एखाद्या खेळाडूची मूळ रक्कम भरून त्या खेळाडूला आपल्या संघात घेऊ शकते. जर एखाद्या खेळाडूला फ्रेंचायझीने 10 कोटी रूपये खर्च करून घेतलं असेल. तर तितकेच पैसे त्या फ्रेंचायझीला देऊन संघात घेऊ शकतो. यासाठी दुसरा खेळाडू ट्रेड माध्यमातून देण्याची गरज नाही.

म्युच्युअल अग्रीमेंटवर फिक्स्ड अमाउंट : दोन्ही फ्रेंचायझी परस्पर एक रक्कम निश्चित करतात. त्या आधारावर ट्रेड पूर्ण केली जाते. नेमकी काय रक्कम मोजली हे मात्र सार्वजनिक केलं जात नाही. हा करार गोपनीय असतो. जसं की मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत हार्दिक पांड्याचा करार केला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...