AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Window: आयपीएल ट्रेड विंडोत एकाच्या बदल्यात दोन असा करार! तसं झालं तर…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलावापूर्वी बरंच काही घडताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स फासे टाकण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे. संजू सॅमसनसाठी रवींद्र जडेजासह आणखी एका खेळाडूला देण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे.

Trade Window: आयपीएल ट्रेड विंडोत एकाच्या बदल्यात दोन असा करार! तसं झालं तर...
IPL 2026 Trade Window: आयपीएल ट्रेड विंडो एकाच्या बदल्यात दोन असा करार! तसं झालं तर...Image Credit source: PTI/Freepik
| Updated on: Nov 10, 2025 | 2:50 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी फ्रेंचायझींची रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची यादी तयार करायची आहे. रिटेन्शनची डेडलाईनही जवळ येत असल्याने धाकधूक वाढली आहे. कोणत्या खेळाडूंना फ्रेंचायझी रिटेन करणार आणि कोणाला सोडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे रिटेन्शनची यादी जाहीर केलेली नाही. पण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागेल, असं बोललं जात आहे. रिटेन्शनपूर्वी ट्रेड विंडोचा पर्याय खुला झाला आहे आणि फ्रेंचायझी चाहत्यांनी धाकधूक वाढली आहे. कारण ट्रेड विंडोमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूला रिलीज केलं तर काय? असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात तीन खेळाडूंसाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चर्चा सुरु आहे.

चेन्नई सुपर किंग्सला हवा संजू सॅमसन!

आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व योग्यरित्या सांभाळलं आहे. पण संजू सॅमसनने फ्रेंचायझीकडे रिलीज करण्याचं विनंती केल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत त्याच्याबाबत ट्रेड विंडोची चर्चाही जोरदार रंगली आहे. जर तसं झालं नाही तर संजू सॅमसनवर मिनी लिलावात मोठी बोली लागू शकते. पण राजस्थान रॉयल्स त्याला रिलीज करण्याऐवजी ट्रेड विंडोच्या माध्यमातून फायदा करण्याच्या तयारीत आहे. यासाठी इतर फ्रेंचायझींसोबत चर्चांचा जोर बैठका सुरु आहेत. असं असताना चेन्नई सुपर किंग्स ट्रेंड विंडोसाठी आग्रही असल्याचं दिसत आहे. संजू सॅमसनसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचं बोललं जात आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ट्रेडसाठी चर्चा रंगली आहे. या करारात तीन खेळाडूंचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये सहभागी होण्याची चिन्ह अधिक आहेत. यासाठी चेन्नई सुपर किंग्स दोन दिग्गज खेळाडूंवर पाणी सोडण्यास तयार आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सला देण्याची तयारी दाखवली आहे. चेन्नई सुपर किंग्सला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे. त्यामुळे संजू सॅमसनकडे पाहिलं जात आहे. महेंद्रसिंह धोनी आहे पण इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपाने राहील.

किती रुपयांची डील होऊ शकते?

संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्यातील डील अजूनही निश्चित नाही. पण चर्चांचे फड मात्र रंगले आहेत. जर हा करार झाला तर आयपीएलमधील सर्वात आश्चर्यकारक ट्रेड होऊ शकते. सॅमसन आणि जडेजाची थेट अदलाबदली होईल. कारण दोघांची आयपीएल फी 18 कोटी आहे. तर सीएसकेने मागच्या पर्वात सॅम करनला 2.40 कोटीला विकत घेतलं होतं. ही रक्कम राजस्थानला मोजावी लागू शकते.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.