सीएसकेने रवींद्र जडेजाचा Video पोस्ट करताच खळबळ, नेमकं काय घडतंय?
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझी संघाची बांधणी करत आहेत. मिनी लिलावासाठी अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण त्यापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची बोलणी सुरु आहेत. असं असताना सीएसकेच्या एका व्हिडीओने खळबळ उडाली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेचं पर्व सुरू होण्याआधी फ्रेंचायझी नव्याने संघ बांधणी करण्यास सज्ज आहेत. आयपीएल फ्रेंचायझी आपल्या आवडत्या खेळाडूसाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चर्चा करत आहे. याबाबतच्या काही बातम्या समोर येत आहेत. पण फ्रेंचायझी अधिकृतपणे काहीच सांगत नाहीत. असं असताना राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं दिसत आहे. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही याबाबत सांगितलं आहे. पण राजस्थान रॉयल्सला कोणता खेळाडू द्यायचा याबाबत मात्र चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सने स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण अचानक रवींद्र जडेजाचा व्हिडीओ पोस्ट करण्याचं कारण काय?
सीएसकेने पोस्ट केलेल्या जडेजाच्या व्हिडीओत काय?
चेन्नई सुपर किंग्सने 7 नोव्हेंबरला एक व्हिडीओ इंस्टाग्राम आणि एक्स खात्यावर केला आहे. हा रवींद्र जडेजाचा व्हिडीओ आहे. यात रवींद्र जडेजा भारतीय संघाच्या जर्सीत किंवा चेन्नई सुपर किंग्सची जर्सी नसल्याने चाहत्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. रवींद्र जडेजा रेग्युलर शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. इतकंच काय तर त्याच्या हातात बॅट असून त्याच्या स्टाईलमध्ये तो तलवारबाजी करत आहे. सामन्यात अर्धशतक किंवा शतक केल्यानंतर करतो तसं… या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला चित्रपटाचा ऑडिओ आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये संजू सॅमसनबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.
Very good Thalapathy….. Super. Super. Super 😂🥳⚔️#WhistlePodu pic.twitter.com/7fcUJA4lI1
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 7, 2025
सीएसकेने जडेजाचा हा व्हिडिओ पोस्ट करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला आहे.. पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रेडचा उल्लेख केलेला नाही. परंतु सोशल मीडिया युजर्स आणि क्रीडाप्रेमी आपआपल्या परीने याचा अर्थ घेत आहेत. अनेकांनी जडेजा सीएसकेसोबतच असेल असा अंदाज बांधला आहे. पण ट्रेड विंडो बंद होण्याआधी काहीही घडू शकतं हे देखील नाकारता येत नाही. मिनी लिलावापूर्वी रिटेन्शन केलेल्या खेळाडूंबाबत उत्सुकता असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात वेगाने घडामोडी घडणार हे नक्की झालं आहे.
