Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील वाजिद खान यांनी ही तक्रार केली असून, भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाजिद खान यांनी सांगितले की, टी-२० वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील वाजिद खान यांनी ही तक्रार केली असून, भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाजिद खान यांनी सांगितले की, टी-२० वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. त्या वेळी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता आणि दोघांनी एकमेकांना आलिंगनही दिले. याच वेळी हार्दिक पंड्याने आपल्या खांद्यावर भारताचा तिरंगा झेंडा घातल्याचे दिसून आले. तक्रारदाराच्या मते, त्यानंतर हार्दिक पंड्या तिरंग्यावर झोपल्याचे आणि त्या दरम्यान गर्लफ्रेंडसोबत जवळीक दाखवल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा प्रकार राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाजिद खान यांनी सांगितले की, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार हा गुन्हा ठरू शकतो. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,

