AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Booking : गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!

गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग करू शकता. हे मार्क कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

Gas Booking : गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!
GAS BOOKINGImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 13, 2026 | 12:45 AM
Share

How To Book Gas : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात नैकर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे लोकांपुढे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद करून टाकल्याने जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन अनेकजण नेहमीप्रमाणे फोन कॉलच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अनेकांना हा गॅस बुकिंग करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यामुळेच ग्रॅस वितरण केंद्रावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. फोन कॉलच्या माध्यमातून गॅस बुक होत नसेल तर इतरही काही मार्ग आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग करू शकता. हे मार्क कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

व्हॉट्सअॅपच्या मदतीने करा गॅस बुकिंग

फोन कॉल करून तुमचा गॅस बुक होत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही गॅस बुकिंग करू शकता. त्यासाठी Indane गॅस कंपनीच्या ग्राहकांनी आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 7588888824 या मोबाईल क्रमांकावर ‘REFILL’ असा व्हॉट्सअॅप मासेज करायचा आहे. त्यानंतर एचपी गॅसचे ग्राहक असलेल्यांनी 9222201122 या मोबाईल क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा व्हॉट्सअॅप मेसेज टाईप करायचा आहे. भारत गॅसच्या ग्राहकांनी 1800224344 या क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Book’ असा व्हॉट्सअॅप मेसेज करायचा आहे.

या अॅपच्या मदतीने करता येईल गॅस बुक

तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातूनदेखील गॅस बुक करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे UMANG अॅप असायला पाहिजे. सोबतच Paytm, PhonePe, Amazon Pay यासारख्या ऑनलाईन आर्थिक व्यवहार करावयाच्या अॅपमधूनही तुम्ही गॅस बुकिंग करू शकता.

तुम्ही एसएमएस करूनही गॅस बुकिंग करू शकता

ग्राहक गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी SMS चीही मदत घेऊ शकतात. त्यासाठी Indane कंपनीच्या ग्राहकांनी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 7718955555 या मोबाईल क्रमांकावर ‘REFILL’ अला मेसेज करू शकता. Bharat Gas चे ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 7715012345 किंवा 7718012345 या मोबाईलवर ‘LPG’ असे लिहून SMS केल्यास तुमचा गॅस बुक होईल.

(टीप- ही केवळ प्राथमिक माहिती आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घ्यावा.)

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली