19 वर्षाच्या तरुणीचे 70 वर्षाच्या म्हाताऱ्यावर जडले प्रेम, मुलगी म्हणाली, “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती”

| Updated on: Nov 15, 2022 | 4:48 PM

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा 70 वर्षीय म्हाताऱ्यावर जीव जडला. प्रेमात वेडे झालेल्या या जोडप्याने थेट संसारही थाटला.

19 वर्षाच्या तरुणीचे 70 वर्षाच्या म्हाताऱ्यावर जडले प्रेम, मुलगी म्हणाली,  इश्‍क में उम्र नहीं देखी जाती
हेच ते जोडपं
Image Credit source: Social Media
Follow us on

लाहोर, मॉर्निंग वॉकला निघालेल्या 19 वर्षीय तरुणीचा  एका 70 वर्षीय म्हाताऱ्यावर (70 Years Pakistani Men) जीव जडला, दोघांमध्ये काही बोलणे झाले आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. इतक्यावरच न थांबता त्यांनी संसार देखील थाटला आहे. (Marry to 19 year old Girl)  या जोडप्याची प्रेमकहाणी व्हायरल झाली आहे. या जोडप्याचे नाव लियाकत आणि शमाइला असे असून ते दोघे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहतात. 70 वर्षीय लियाकत अली हे त्यांच्या प्रेमप्रकरणावर खुलेपणाने बोलत आहेत. लियाकतने पहिल्या भेटीबद्दल सांगितले की, ‘एकदा शमाइला फिरायला  जात असताना मी मागून गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने  माझ्याकडे वळून पाहिले आणि ती माझ्या प्रेमात पडली.

मुलगी म्हणते “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती”

जेव्हा शमाईलाला विचारलं की लिकायात हे तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, तरी तू त्यांच्या प्रेमात कशी काय पडली? तर त्यावर ती म्हणाली की, “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती, बस हो जात हैं”   प्रेमात वय पाहत नसल्याचे स्पष्ट मत 19 वर्षीय शामाईलाने दिले आहे.

दुसरीकडे लियाकत अली यांनीसुद्धा प्रतिक्रिया देत म्हंटले की, हृदय तरुण असायला हवे, वय हा फक्त आकडा आहे.  शमाइला सांगते की, घरच्यांनी सुरुवातीला या नात्यावर आक्षेप घेतला होता, पण तिने घरच्यांचे मन वाळविले.  घरच्यांचे म्हणणे होते की, तुम्ही दोघे तयार आहात तर आम्ही काय करू शकतो. थोडक्यात काय तर, “मियाँ बीवी राज़ी तो  क्या करेगा क़ाज़ी” ही म्हण या दोघांना लागू पडते. या जोडप्याने सांगितले की त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले.

हे सुद्धा वाचा

YouTube व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

वयाच्या अंतरामुळे चर्चेत आलेल्या या पाकिस्तानी जोडप्याची एका युट्युबरने मुलाखत घेतली आहे. नेटकरींनी या व्हिडीओवर   कमेंट्सचा पाऊस पडला आहे. लियाकत यांना विचारले असता, वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? त्यावर ते म्हणाले की प्रेमाला आणि लग्नाला वयाचे बंधन नसते. दुसरीकडे, शमाईलाने सांगितले की, प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.

रोमँटिक होण्यासाठी वयाची अट नसते

लियाकत म्हणतो की, रोमँटिक होण्यासाठी वयाची अट नसते. प्रत्येक वयाचा स्वतःचा वेगळा प्रणय असतो. लियाकत म्हणाले की, त्याने आयुष्यभर आनंद लुटला आहे. शमायला म्हणते की ती लियाकतसोबत खूप खूश आहे.

जोडप्याने एकमेकांसाठी गायले गाणे

मुलाखतीदरम्यान लियाकतने शमाईलासाठी ‘जानू सुन जरा, आंखे तो मिला…’ हे गाणेही गायले. शमाईलाने लियाकतसाठी ‘मोहब्बत बरसा देना तुम, सावन आया है’ हे गाणे गायले.