रशियाकडून युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची शक्यता, तज्ज्ञांच्या मते युद्ध चौथ्या आणि अंतिम चरणावर

| Updated on: Nov 26, 2022 | 10:24 AM

रशियाने युक्रेनलान अठराव्या शतकात पाठविण्याची धमकी दिली आहे. येत्या काळात पुतीन युक्रेनवर विनाशकारी हल्ले करू शकतो.

रशियाकडून युक्रेनवर मोठ्या हल्ल्याची शक्यता, तज्ज्ञांच्या मते युद्ध चौथ्या आणि अंतिम चरणावर
रशिया युक्रेन युद्ध
Image Credit source: Social Media
Follow us on

कीव्ह,  रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) हे त्याच्या सर्वनाशाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.  बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी युक्रेनचा संपूर्ण विनाश करण्याचा अल्टिमेटम दिला असताना रशियाकडून युक्रेनला 18व्या शतकात नेण्याचा इशारा देण्यात आला होता. नऊ महिन्यांनंतर युद्ध आता पुढच्या टप्प्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. संरक्षण तज्ज्ञ यावर विचार करत आहेत. हा युद्धाचा चौथा (Fourth Stage) आणि अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात पुतिन यांचे लक्ष्यही बदलले आहे, ज्याचा पुरावा म्हणजे प्रथमच पॅरा ट्रूपर्स युद्धक्षेत्रात उतरले आहेत.

अलेक्झांडर लुकाशेन्को व्लादिमीर पुतिनच्या प्रत्येक रहस्यमय योजनेत भागीदार आहे. पुतिन राजवटीची शपथ घेतलेल्या या व्यक्तीचे नाव अलेक्झांडर लुकाशेन्को आहे, ते बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्याला पुतिनचा उजवा हात म्हणतात. युक्रेनने हालचाल केली नाही तर सर्वनाश निश्चित असल्याचे अलेक्झांडर लुकाशेन्को म्हणाले आहे. आता ज्या क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे ते येणाऱ्या विनाशाच्या तुलनेत काहीच नाही. युक्रेनला अंतिम इशारा देण्यात आला आहे. कारण आतापर्यंत वापरण्यात आलेल्या बळामुळे युक्रेन खचलेला नाही. त्यामुळे आता शेवटचा मार्ग म्हणजे युक्रेनला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे.

23 नोव्हेंबर रोजी झाला क्षेपणास्त्र हल्ला

23 नोव्हेंबरच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरच कीव आक्रोश करत आहे. ना अमेरिकन शस्त्रे त्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकली, ना पाश्चात्य देशांची शस्त्रे.  लुकाशेन्को ज्या हल्ल्याबद्दल बोलत आहेत तो इतका भीषण असेल, याची कल्पना त्यांच्या विधानावरून करता येईल. युक्रेनने युद्ध थांबवले पाहिजे, अन्यथा युक्रेनचा नायनाट होईल, असे लुकाशेन्को यांनी म्हटले आहे. येणारा धोका युक्रेनच्या सार्वभौमत्वावर नसून संपूर्ण देशाच्या अस्तित्वावर आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वनाशाच्या दिशेने पुतिनची पाऊलं

यावरूनच पुतिन यांनी युक्रेनवर सर्वात विनाशकारी हल्ला करण्याचे मन बनवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतिहासात कधीही घडलेले नाही इतके विनाशकारी आणि प्राणघातक हल्ले पुतीन युक्रेनवर करू शकतात. पुतीनच्या अगदी जवळचे असलेले प्योटर टॉल्स्टॉय यांनी आर्मेनियाच्या सामूहिक सुरक्षा संधि संघटनेत पोहोचल्यावर लुकाशेन्को यांनी जे सांगितले होते त्याचप्रमाणे विधान केले आहे. रशियन संसदेचे राज्य ड्यूमाचे उपाध्यक्ष टॉल्स्टॉय यांनी म्हटले आहे की रशिया युक्रेनला 18 व्या शतकात ढकलेल. टॉल्स्टॉयने जे म्हटले आहे, ते विनाशाचे चक्र सुरू झाले आहे.

युक्रेनचे 3 अणुऊर्जा संयंत्र ग्रीड निकामी

रशियाच्या हल्ल्यापूर्वी युक्रेन कसे चमकत होते, पण त्यानंतर काय झाले, हेच चित्र सांगत आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या 3 अणुऊर्जा प्रकल्पांचे ग्रीड कनेक्शन तुटले आहे. युक्रेनमध्ये तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. घरांच्या हीटिंग सिस्टम काम करत नाहीत. गोठवणाऱ्या थंडीत लोक थरथर कापत आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे.कीवमध्ये लोक पाण्यासाठी रांगा लावत आहेत. विजेशिवाय लोकांना गरम पाणीही मिळत नाही. युक्रेन क्षेपणास्त्र हल्ल्यांनी उद्ध्वस्त झाले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वीजपुरवठा बंद झाल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे WHO ने म्हटले आहे. युक्रेनची वीज यंत्रणा उद्ध्वस्त करून पुतिन यांनी युद्धाचा चौथा टप्पा सुरू केला आहे.

पुतिनचा चौथा आणि सर्वात विनाशकारी टप्पा

युरोपमधील युनायटेड स्टेट्स आर्मीचे माजी कमांडर मार्क हर्टलिंग यांनी म्हटले आहे की पुतिन यांनी युद्धाचा चौथा आणि सर्वात विनाशकारी टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यात पुतिन यांचे लक्ष्य युद्ध संपवणे हे आहे. चौथ्या टप्प्यात पुतिन युक्रेनमधील संपूर्ण पायाभूत सुविधा नष्ट करणार आहेत आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणार आहेत, जेणेकरून युक्रेनशी करार करण्यासाठी परिस्थिती निर्माण करता येईल. चौथ्या टप्प्यात पूर्वीपेक्षा अधिक विध्वंसक हल्ले सुरू आहेत. युद्धाला एका वळणावर नेण्यासाठी, पुतिन यांनी आपले सर्वात एलिट फोर्स फ्रंटलाइनवर पाठवले आहे.