सीमेवर तणाव, मोठी सर्जिकल स्ट्राईक, थेट उडाली खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा वाढल्याचे बघायला मिळत आहे. अफगाणिस्तानने पाकच्या सैन्य चाैक्यांना टार्गेट करत मोठा हल्ला केला. या हल्ल्याने थेट खळबळ उडावी. अफगाणिस्तानने दावा केला की, आम्ही पाकवर सर्जिकल स्ट्राईक केली.

सीमेवर तणाव, मोठी सर्जिकल स्ट्राईक, थेट उडाली खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
Pakistani Army
| Updated on: Apr 03, 2026 | 8:25 AM

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. पाकिस्तानने मोठा हवाई हल्ला अफगाणिस्तानवर केला. या हल्ल्यात 400 पेक्षा अधिक लोक ठार झाले. एका रूग्णालयावर हा हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानने त्यावेळीच सांगितले होते की, या हल्ल्याचा आम्ही बदल घेतल्याशिवाय राहणार नाहीत. काही पाकिस्तानी चाैक्यांवर अगोदरच अफगाणिस्तानने ताबा मिळवला. पाकिस्तानच्या सैनिकांना पळूपळू मारले. आता पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील ड्युरँड रेषा ओलांडून खोस्त खुर्रम सीमेजवळील पाकिस्तानी लष्करी तळांवर मोठा हल्ला केला. हेच नाही तर ही सर्जिकल स्ट्राईक असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये मोठा हल्ला करत कहर केला होता. त्याचा बदला हळूहळू करून तालिबानकडून घेतला जात आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सैन्याकडून तोफखाना आणि रणगाड्यांच्या मदतीने हल्ले केले जात आहेत. सीमेवर रात्री उशिरा तणाव वाढला आणि गोळीबाराला सुरूवात झाली. रात्री सुमारे साडेबारा वाजेपर्यंत सर्जिकल स्ट्राईक सतत सुरू होती. अफगाणिस्तानने केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाले.

हेच नाही तर अफगाणिस्तानने केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 पेक्षा अधिक सैनिक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ऐन रमजानच्या महिन्यात पाकिस्तानकडून मोठा हल्ला अफगाणिस्तानवर करण्यात आला. त्यानंतर आता पाकिस्तानही चांगलाच पेटून उठल्याचे बघायला मिळत आहे.  3 मार्च रोजी अफगाणिस्तानने पाकिस्तानी सैन्यावर मोठा आरोप केला होता. पाकिस्तानी सैन्याने कुनार प्रांतातील असदाबाद येथील भागात मोठा हल्ला केला.

या हल्ल्यात 16 जण जखमी झाले, त्यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानकडून सतत हल्ले केले जात असताना पुन्हा अफगाणिस्तानने हल्ले करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने हल्ले करत थेट पाकिस्तानच्या एअरबेसला टार्गेट करत हल्ले केले होते. त्यामध्येच मोठे नुकसान या एअरबेसचे झाले होते. त्यादरम्यान त्यांनी भारतावर आरोप करत अफगाणिस्तानला भारत मदत करत असल्याचे म्हटले होते.

Follow Us