1974 नंतर दुप्पट झाली जगाची लोकसंख्या, जाणून घ्या जगाची लोकसंख्या आता किती आहे?

| Updated on: Nov 15, 2022 | 10:43 AM

1974 च्या तुलनेत जगाची लोकसंख्या दुप्पट झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक संघटनेच्या अहवालात दिल्या गेली आहे.

1974 नंतर दुप्पट झाली जगाची लोकसंख्या, जाणून घ्या जगाची लोकसंख्या आता किती आहे?
जागतिक लोकसंख्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, जगाची लोकसंख्या (World Population) झपाट्याने वाढत आहे. यामुळे उपलब्ध संसाधनांच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  चीनसह अनेक देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने एक अहवाल जारी केला आहे. यामध्ये जगाची लोकसंख्या दुपटीने वाढल्याचे सांगण्यात आले आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या 4 अब्ज होती. आता हा आकडा वाढून आज 8 अब्ज झाला आहे. आता भविष्यात लोकसंख्या दुप्पट होणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. तथापि, पुढील काही दशकांपर्यंत जगाची लोकसंख्या वाढत राहील.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की लोकसंख्या वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे जगातील कमी मृत्यू आणि वाढते आयुर्मान. याचाच अर्थ जगात वृद्धांची लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे जागतिक मध्यम वयही वाढत आहे. सरासरी वय लोकसंख्येला दोन समान भागांमध्ये विभागते. 1974 मध्ये, जागतिक लोकसंख्येचे सरासरी वय 20.6 वर्षे होते. याचा अर्थ जगातील निम्मी लोकसंख्या 22.2 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. अर्धी लोकसंख्या यापेक्षा जुनी असताना. आता सध्याचे सरासरी वय 30.5 वर्षे आहे.

सन 2100 मध्ये लोकसंख्या 10 अब्जांच्या वर जाईल

सध्याच्या मूल्यांकनानुसार, चीनची लोकसंख्या आज 1.42 अब्ज आहे. तर भारताची लोकसंख्या 1.41 अब्ज आहे. अमेरिकेची लोकसंख्या अंदाजे 338 दशलक्ष आहे. इंडोनेशियाची लोकसंख्या 276 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानची लोकसंख्या अंदाजे 236 दशलक्ष आहे. तुर्तास तरी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्याची लोकसंख्या सतत वाढत आहे. 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.5 अब्ज असू शकते, असेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले जात आहे. 2050 पर्यंत ते 9.7 अब्ज आणि 2100 पर्यंत 10.4 अब्ज होईल.

हे सुद्धा वाचा

भारतासह 8 देशांमध्ये अधिक लोकसंख्या वाढेल

जागतिक लोकसंख्या 7 अब्ज ते 8 अब्जांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागली असल्याचे सांगण्यात आले. अशा स्थितीत 2037 पर्यंत म्हणजेच 15 वर्षांत तो 9 अब्जांच्या आकड्याला स्पर्श करू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या वाढ केवळ आठ देशांमध्ये केंद्रित होईल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यांची नावे काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, टांझानिया आणि फिलीपिन्स आहेत.