Tibet Earthquake: नेपाळनंतर तिबेट हादरले, अवघ्या चार तासात शक्तिशाली भूकंपाचे धडाधड 13 धक्के, 16 जणांचा मृत्यू
Tibet Earthquake: चीनच्या ताब्यातील तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरूवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमध्ये अवघ्या चार तासांच्या कालावधीत धडाधड 13 भूकंपाचे धक्के जाणवेल. सर्वाधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का हा रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता 7 इतकी होती.

Tibet Earthquake: चीनच्या ताब्यातील तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरूवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपाने रात्रभर नागरीक जीव मुठीत ठेवून होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माहितीनुसार, तिबेटमध्ये अवघ्या चार तासांच्या कालावधीत धडाधड 13 भूकंपाचे धक्के जाणवेल. सर्वाधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का हा रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता 7 इतकी होती.
तिबेटमध्ये भूकंपाची मालिका
रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी भूकंपाचा 7 तीव्रतेचा मुख्य धक्का बसला. त्यानंतर रात्रभर तिबेटमधील जमीन हादरत होती. रिश्टर स्केलवर 5, 4.8, 4.7 आणि 4.3 अशा तीव्रतेचे एकामागून एक धक्के बसत होते. त्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. नागरीक भयभीत झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदु हा तिबेटची राजधानी ल्हासापासून 400 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 173 किलोमीटर खोलीवर असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तात्काळ मदत कार्याला सुरुवात केली आहे.
16 जणांचा मृत्यू जीवितहानी नाही, प्रशासन सतर्क
तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंपाचे सलग 13 धक्के बसले. यामुळे मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात होती. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 16 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अद्याप मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन नैसर्गिक आपत्तीवर, संकटावर लक्ष ठेवून आहे. तातडीने मदतीलाही सुरूवात झाली आहे. तर नुकसानीचा अंदाजही घेण्यात येत आहे. तिबेट परिसरातील धरण, तलाव आणि नद्यांवरही प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. नेपाळसारखी आपत्ती ओढावू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे.
भूगर्भीय तणावामुळे भूकंप
भूगर्भशास्त्रज्ञांनुसार, तिबेटचे पठार हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्नोटिक प्लेट यांच्यातील हालचाली आणि घर्षणामुळे वारंवार भूकंपाचे हादरे बसतात. पण यावेळी त्याची तीव्रता अधिक जाणवली. वाढते तापमान, वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या आणि हवामानातील बदलामुळे भूगर्भीय हालचाली वाढल्या आहेत. नेपाळमधील विनाशकारी भूकंप आणि त्यानंतर आलेल्या महापूरामुळे हजारो लोकांचा जीव गेला. त्यात अनेक पर्यटकांचाही समावेश होता. हिमालयातील हिमनद्या आणि हिम तलावांना यामुळे धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. आता तिबेटमधील भूकंपनाने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली आहे.