भीषण अपघात! धावपट्टीवरून विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेत मोठी विमान दुर्घटना घडल्याचे समोर आलं आहे. या विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघात! धावपट्टीवरून विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 7:16 AM

अमेरिकेमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडाच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान कोसळून दुर्घटना घडली. धावपट्टीवरून घसरून पुढे गेल्यानंतर विमानाला आग लागली. त्यानंतर धावपट्टीजवळ उभ्या वाहनांना धडक दिली. या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर अमेरिकेतील विमान सेवा विस्कळीत झाली आहे.

विमानाने धावपट्टीवर उभ्या असलेल्या वाहनाना धडक दिली. त्यानंतर विमानाला आग लागली. विमानातून धूर देखील निघू लागला. विमानाला आग लागल्याच्या घटनेनंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर सर्व धावपट्टी आणि टॅक्सीवे सेवा बंद करण्यात आली. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना रविवारी दुपारी घडली.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us