Apple कंपनीचा लोगो अन् ‘नीम करोली बाबा’चा आशीर्वाद, जगातल्या सर्वात फेमस कंपनीची सुरुवात कशी झाली

Apple कंपनीची सुरुवात कशी झाली आणि तिला हे नाव कसे मिळाले याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. तुम्हाला माहिती आहे का या कंपनीला नाव कसे पडले?

Apple कंपनीचा लोगो अन् ‘नीम करोली बाबा’चा आशीर्वाद, जगातल्या सर्वात फेमस कंपनीची सुरुवात कशी झाली
Apple and neel karoli Baba
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 02, 2026 | 7:22 PM

Apple कंपनीला नुकताच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ही कंपनी एका साध्या गॅरेजमधून सुरू झाली होती, पण आज ती जगातील सर्वात मोठी आणि शक्तीशाली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे आज २.५ अब्ज सक्रिय डिव्हाइसेससह ३.५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त बाजारमूल्य आहे. १९७६ साली १ एप्रिल रोजी, कॉलेजमधील शिक्षण अर्धवट सोडलेल्या दोन मित्रांनी, स्टीव जॉब्स आणि स्टीव वोज्यनियाक यांनी जॉब्स कुटुंबाच्या गॅरेजमधून रॉन वेन यांच्यासोबत मिळून Apple कंपनीची सुरुवात केली होती. तेव्हापासून Appleने अफाट विस्तार केला आहे. कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथे कंपनीने एक विशाल मुख्यालय उभारले आहे. येथे सुमारे १६६,००० कर्मचारी काम करतात. कंपनीचे बाजारमूल्य ३.५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले असून, ती Nvidia नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. पण आज Apple केवळ एक तंत्रज्ञान कंपनी राहिलेली नाही. ती एक सांस्कृतिक प्रतीक बनली आहे, जिचे जगभरात लाखो निष्ठावंत चाहते आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us