Elon Musk : एलॉन मस्कची मोठी घोषणा, तब्बल 1000000000000 रुपयांचे गिफ्ट वाटणार, प्रत्येक मुलाला…

मस्क या मुलांना शेअर वाटणार असल्याचे गृहित धरून हा हिशोब मांडण्यात आलाय. सध्या अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत 146 डॉलर्स आहे.

Elon Musk : एलॉन मस्कची मोठी घोषणा, तब्बल 1000000000000 रुपयांचे गिफ्ट वाटणार, प्रत्येक मुलाला...
elon musk spacex share
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 9:37 PM

Elon Musk Share Gifting : अब्जाधीश आणि उद्योगपती एलॉन मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याच्याकडे असलेली संपत्ती पाहून भलभले थक्क होतात. एआय, अंतराळ संशोधन, वाहन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मस्कने कोट्यवधी डॉलर्सच गुंतवणूक केलेली आहे. मस्क भारतातही टेलिकॉम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. एलॉन मस्क फक्त त्याच्या कमाईच्या बाबतीतच जगात प्रसिद्ध नाही, तर आतापर्यंत त्याने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे तो चर्चेत येतो. आता तर मस्कने सर्वात मोठा निर्णय घेतलाय. तो अमेरिकेतल्या प्रत्येक मुलाला तब्बल 1000000000000 रुपयांचे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलाय. हे गिफ्टही विशेष असणार आहे.

मस्कने नेमकी काय घोषणा केली?

एलॉन मस्कने त्याच्या एक्स खात्यावर याबाबतची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार एलॉन मस्क अमेरिकेतल्या प्रत्येक मुलाला त्याच्या स्पेस एक्स या कंपनीचा एक शेअर गिफ्ट म्हणून देणार आहे. विशेष म्हणजे ही फक्त पहिली घोषणा आहे. भविष्यात अशा बऱ्याच घोषणा मी करणार आहे, असंही मस्कने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलंय.

Loading...

योजना नेमकी कशी, कसं वितरण होणार?

एलॉन मस्कने आपल्या या योजनेबाबत फक्त घोषणा केलीय. या ट्वीटनुसार स्पेस एक्सचा एक शेअर फक्त अमेरिकेतील मुलांनाच मिळणार आहे. या घोषणेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या शेअरचे वितरण कसे होणार? हे अद्याप समोर आलेले नाही. सोबतच शेअरचे वितरण करण्यासाठी अटी कुठल्या असतील, वयाची मर्यादा काय असेल? याबाबतही मस्कने अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळेच मस्कने शेअर देण्याची घोषणा केलेली असली तरीही त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक शंका आहेत.

मस्कच्या या घोषणेनंतर वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स या पेजने एक हिशोब मांडला आहे. अमेरिकेत 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची संख्या साधारण 7.2 कोटी आहे. मस्क या मुलांना शेअर वाटणार असल्याचे गृहित धरून हा हिशोब मांडण्यात आलाय. सध्या अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत 146 डॉलर्स आहे. या सगळ्या 7.2 कोटी अमेरिकन मुलांना शेअर द्यायचा म्हटलं तर त्याची अंदाजे किंमत 10.5 अब्ज डॉलर्स होईल. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास या शेअर्सची एकूण किंमत एक लाख कोटी रुपये होईल. त्यामुळेच मस्क आता या घोषणेची अंमलबजावणी कशी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us