इस्तंबूलमध्ये स्फोट, 6 ठार-53 जखमी, दहशतवादी हल्ल्याने हादरले शहर

| Updated on: Nov 13, 2022 | 9:43 PM

तुर्कीच्या इस्तंबूल शहरात बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी हा दहशदवादी हल्ला असल्याचे सांगितले.

इस्तंबूलमध्ये स्फोट, 6 ठार-53 जखमी, दहशतवादी हल्ल्याने हादरले शहर
बॉम्ब ब्लास्ट
Image Credit source: Social Media
Follow us on

इस्तंबूल, तुर्कीच्या इस्तंबूल शहरात मोठा स्फोट (Bomb Blast In Istanbul) झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्तंबूलच्या गजबजलेल्या रस्त्यावर हा स्फोट झाला असून त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी इस्तिकलाल एव्हेन्यू या इस्तंबूलच्या मुख्य पादचारी रस्त्यावर झालेल्या स्फोटात 6 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

हा दहशदवादी हल्ला- राष्ट्राध्यक्ष

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी या स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी, इस्तंबूलचे गव्हर्नर अली येरलिकाया यांनी ट्विट केले की, हा स्फोट संध्याकाळी 4:20 वाजता झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते.  हा स्फोट का आणि कसा झाला हे जाणून घेण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेशी संबंधित व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये लोक बेशुद्ध पडलेले दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमधे दिसत आहेत ज्वाळा

ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत आणि नंतर एक मोठा आवाज झाला, त्यानंतरत लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला. इतर फुटेजमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे दिसत आहे.

2015 ते 2017 दरम्यान झाले अनेक बॉम्बस्फोट

घटनेनंतर  परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.  हा मार्ग स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यस्त मार्ग आहे. येथे अनेक दुकाने आणि रेस्टॉरंट आहेत. 2015 ते 2017 दरम्यान तुर्कीमध्ये अनेक स्फोट झाले, जे इस्लामिक स्टेट आणि बेकायदेशीर कुर्दिश गटांशी संबंधित आहेत.