भारताला ज्याची भीती तेच घडले, चीन आणि अमेरिकेकडून मोठा धक्का, एआयच्या..
मागच्या काही दिवसांचा विचार केला असता भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारली आहेत. पण आता चीनकडून भारताला मोठा दणका देण्यात आला. अमेरिकेनेही यात चीनची साथ दिली. ज्यानंतर भारताच्या समस्येत वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. जिनपिंग 3 दिवसीय अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जिनपिंग यांचे स्वागत केले. या दोघा नेत्यांनी बैठकीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस एकमेकांना सहकार्य आणि व्यापार या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, यादरम्यान भारताला दोन्ही देशांकडून मोठा धक्का देण्यात आला. यावेळी भारताचा साधा उल्लेखही केला नाही. महाशक्तींमध्ये एआय नियंत्रण आणि हेल्दी कॉम्पीटीशन यांच्यावर सहमती झाली. याचा थेट परिणाम जगावर होईल, ज्यात भारताचाही समावेश आहे. व्हाईट हाईसमध्ये बोलताना जिनपिंग यांनी एआय सुरक्षा आणि त्याचे मानव नियंत्रण या मुद्द्यावर मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशाची काम आहे की, यावर मानवी नियंत्रण राहिल. जिनपिंग यांनी म्हटले, आपल्याजवळ एआयच्या चांगल्या कामांसाठी ताकद आणि जबाबदारी आहे.
आपल्याला हे देखील बघावे लागेल की, एआय कायम मानवाच्या नियंत्रणाखाली असेल. त्यातच सर्वांचा फायदा आहे. दोन्ही देशातील स्पर्धेवरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपल्याला शांतीपूर्ण पुढे जावे लागेल. अमेरिका आणि चीन यासारख्या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करायला हवे. आपली स्पर्धा चांगली आणि नियमात राहून असली पाहिजे.
एक दुसऱ्यांपासून स्पर्धेक पुढे जाण्याची जिद्द असली पाहिजे, पण कुस्तीसारखे एकाचा पराभव आणि एकाचा विजय असे नाही. चीन आणि अमेरिकेने हे बघितले पाहिजे की, आपल्यामध्ये कोणताही संघर्ष होणार नाही. दोन्ही महान देशांनी चर्चा करून मार्ग काढला हवा. आपल्या सैन्यानेही नियमित संवाद ठेवायला हवा. दोन्ही देशातील सैन्यामध्ये चर्चा झाली तर त्याचा फायदा सर्वांनाच आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही शी जिनपिंग यांच्या या दाैऱ्यावर दोन्ही देशातील सुधारणारे संबंध सकारात्मक असल्याचे म्हटले. एआय चर्चेदरम्यान भारताचे साधे नावही दोन्ही देशांकडून घेण्यात आले नाही. पण भारताची या सर्व गोष्टींवर बारीक नजर आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक उत्पादन अमेरिकेला मोठी मदत झाली. अमेरिका चीन एआय आणि चिप्सवरून स्पर्धा तयार झाली. अल्टरनेटिव हब बनण्याचा रस्ता खुला झाला.