अमेरिकेला युद्धात सर्वात मोठा दणका, थेट म्हटले, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. इराण होर्मुज खाडीमध्ये चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे, इस्लामाबादमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नाही. यादरम्यानच तणाव अधिक वाढताना दिसत आहे.

अमेरिकेला युद्धात सर्वात मोठा दणका, थेट म्हटले, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये..
Donald Trump
| Updated on: Apr 13, 2026 | 3:00 PM

इराण आणि अमेरिकेने दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा केली. त्यापूर्वी युद्ध चांगलेच भडकले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि पुलांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यानंतर अचानक युद्धबंदी दोन आठवड्यांकरिता होणार असल्याची घोषणा करण्यात आली. युद्धात अमेरिका एकटा पडताना दिसला. एकही देश अमेरिकेच्या मदतीला धावून येत नसल्याचे दिसले. युद्धबंदी कराराकरिता इस्लामाबाद निवडण्यात आले. इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास इराण आणि अमेरिकेत चर्चा झाली. पण शेवटी हाती काहीच लागले नाही. उलट इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 एप्रिलपासून होर्मुजच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी जाहीर केली आहे. ट्रम्प यांच्या धमकीला तेहरानने तीव्र प्रत्युत्तर दिले. चीननेही होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव वाढत आहे.

चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी होर्मुज खाडीच्या मुद्दात बोलताना म्हटले की, आम्ही जगात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जहाजे होर्मुज खाडीतून ये-जा करत आहेत. आमचे आणि इराणचे व्यापार करार आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो आणि इतरांनी आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे चीनने स्पष्ट शब्दात सांगितले.

होर्मुज इराणच्या नियंत्रणाखाली आहे आणि आमचे जहाज तिथून ये-जा करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी देखील बोलताना म्हटले की, चीन इराणला शस्त्रपुरवठा करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी दुहेरी-वापराचे तंत्रज्ञान आणि संबंधित उपकरणे आधीच पुरवली आहेत, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत चीन इराणला मदत करत असल्याच आरोप केले जात आहेत. यावर आता चीनकडून स्पष्टपणे भूमिका मांडण्यात आली. यासोबतच आमचे आणि इराणचे व्यापार करार असून आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी म्हटले. होर्मुज खाडीच्या मुद्दात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव हा चांगलाच वाढताना दिसत आहे. युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश पुढे आले. मात्र, मार्ग काही निघताना दिसत नाहीये.

Follow Us