XI jinping US Visit : ही महिला कोण, जिच्या नवऱ्याच्या सुटकेसाठी ट्रम्प जिनपिंग यांच्याशी करणार डील
XI jinping US Visit : अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्ता आहेत. या दोन देशांमध्ये प्रगतीची प्रचंड स्पर्धा आहे. त्यातून तणावही निर्माण होतो. सध्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक करार होतील.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प स्वत: प्रोटोकॉल मोडून शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील जॉइंट बेस अँड्र्यूज येथे जिनपिंग यांचं स्वागत केलं. यावेळी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या देखील मेरीलँडच्या विमानतळावर उपस्थिते होत्या. जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यात व्यापार, संरक्षणासह अनेक मुद्यांवर चर्चा होईल. त्यांच्या चर्चेत एका अमेरिकन नागरिकाच्या सुटकेचा मुद्दा सुद्धा असेल. अमेरिकी एक्सपर्ट यूलिन चेन यांच्याशी संबंधित हा विषय आहे. यूलिन नोव्हेंबर 2024 पासून चीनच्या तुरुंगात आहेत. व्हाइट हाऊसने मला विश्वास दिलाय की, ट्रम्प जिनपिंग यांच्यासमोर यूलिन यांच्या सुटकेचा विषय मांडतील असं यूलिन चेनच्या पत्नी युफांग रोंग यांनी सांगितलं. चीन हेरगिरीचा आरोप करुन खटला चालवेल अशी युफांग यांना भिती आहे.
युफांग रोंग या यूलिन चेन यांच्या पत्नी आहेत. त्यांचे पती अमेरिकेत भूकंप वैज्ञानिक म्हणजे सिस्मोलॉजिस्ट म्हणून काम करतात. उत्तर कोरियाच्या अंडरग्राउंड अणू चाचण्यांचं शोध घेणं ही चेन यांच्यावर जबाबदारी आहे. चेन यांना 2011 साली अमेरिकेच नागरिकत्व मिळालं. ते बोस्टन भागात राहतात. त्यांच्या रिसर्च प्रोजेक्टला अमेरिकी परराष्ट्र विभाग आणि अमेरिकी एअरफोर्सच्या रिसर्च लॅबोरेटरीकडून फंडिंग मिळालेलं. रोंग यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या पतीचा रिसर्च पब्लिक डेटावर आधारित आहे. त्यांनी चिनी वैज्ञानिकांसोबत मिळून काम केलय.
100 पेक्षा जास्तवेळा चौकशी
यूलिन चेन यांना 5 नोव्हेंबर 2024 रोजी बीजिंग इंटरनॅशनल एअरपोर्टवर अटक केली होती. त्यावेळी ते कुटुंबाला भेटायला अमेरिकेला परत जात होते. त्यांनी चीनच्या दोन यूनिवर्सिटीमध्ये व्याख्यानही दिलं होतं. रोंग यांच्यानुसार त्यांच्या पतीची 100 पेक्षा जास्तवेळा चौकशी झाली आहे. अमेरिकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा त्यांना भेटण्याची परवानगी मिळते. ही भेटही चिनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते. चेन यांना चिनी तुरुंगात मिळणारे वैद्यकीय उपचार आणि खाण्यापिण्याची रोंग यांना चिंता आहे. चेन यांना हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज आहे.
चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलय
अमेरिकेच्या मते चीनने त्यांच्या दोन नागरिकांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलय. त्यापैकी चेन एक आहेत. दुसरं प्रकरण मिन जीन यांचं आहे. त्यांना जून महिन्यात अटक करण्यात आली. मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिपार्टमेंट आणि नॅशनल सिक्योरिटी काउंसिलच्या अधिकाऱ्यांसोबत माझी बैठक झाली. त्यावेळी ट्रम्प जिनपिंग यांच्यासमोर चेन यांच्या सटुकेचा मुद्दा मांडतील असं मला आश्वासन दिल्याचं रोंग यांनी सांगितलं.