वधूचे डोळे उघडले तेव्हा पायलट पती तिला बिलगून निपचित पडला होता,लग्नानंतर काही तासांत स्वप्नांचा चुराडा…

एका सुखी दाम्पत्याच्या नव्या संसारिक जीवनाला सुरुवात होऊन अवघे काही तास झाले असतानाच हा अपघात होऊन वराचा असा भयंकर अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे.

वधूचे डोळे उघडले तेव्हा पायलट पती तिला बिलगून निपचित पडला होता,लग्नानंतर काही तासांत स्वप्नांचा चुराडा...
Death in Helicopter Crash
| Updated on: Jun 01, 2026 | 8:17 PM

त्या दोघांनी एकमेकांच्या सोबत आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, शुक्रवारी त्यांनी आपल्या नव्या जीवनाला सुरुवात केली होती. भारतीय वंशाचे २५ वर्षीय पायलट डेव्ह फिजी आणि त्यांची पत्नी जेस्नी यांच्या या नव्या संसाराला कोणाची दृष्टच लागली जणू. कुटुंब,जवळचे मित्र-मैत्रिणी, नातलग आणि शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह संपन्न झाला होता. आणि त्याच रात्री एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलट डेव्ह फिजी यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जेस्नी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

डेव्ह फिजी अटलांटा येथे राहाणार होते आणि डेल्टा एअर लाईन्समध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. त्यांचा विवाह शुक्रवारी डॉसनव्हील येथील द रेवेरे नावाच्या वेडिंग आणि इव्हेंट्स व्हेन्यू येथे झाला होता. कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नसमारंभात शेकडो पाहूणे सामील झाले होते आणि सोहळ्या शानदारपणे साजरा झाला. डेव्ह यांचे आई-वडील जॉर्ज आणि फीबा फिजी मूळचे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवत्तुपुझा क्षेत्रातून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तर जेस्नी हीचे कुटुंबिय देखील केरळच्याच अलाप्पुझा जिल्ह्यातील आहेत.

अपघातानंतर डेव्ह याचे वडील जॉर्ड फिजीने आपल्या मुलाच्या मृत्यूने व्याकुळ होत म्हटले की तो देवाने आम्हाला दिलेला अनमोल उपहार होता. त्याचे लग्न एकदम थाटात संपन्न झाले आणि सोहळा खूपच सुंदर होता आणि कुटुंबा याहून काही जास्त मागू शकत नव्हता. परंतू काही तासात सर्वकाही बदलले.

माहितीनुसार लग्नानंतर नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने पीचट्री- डीकाल्ब एअरपोर्टला जाणार होता. तेथे त्यांना अॅटलांटा शहरातील एका हॉटेलात रात्र घालवायची होती. मात्र, समारंभानंतर अचानक हवामान खराब झाले. रात्री सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सोहळा संपला आणि त्यावेळी त्या भागात पाऊस आणि दाट धुके होते,त्यामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती.

लग्नाच्या रात्री दुर्दैवी घटना

डेव्ह फिजी हे स्वत:एक अनुभवी कमर्शियल पायलट होते आणि खराब हवामानामुळे उड्डाणा घेताना चिंताग्रस्त होते. त्यांच्या वडीलांनी सांगितले की डेव्ह म्हणाला होता की इतक्या कमी दृश्यमानतेत उड्डाण घेणे कठीण असेत. तरीही त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. पायलटने उंचावर जाऊन उड्डाण घेण्याचा निर्णय घेतला.

उड्डाण भरल्यानंतर काही वेळानंतरच पाच आसनी हे रॉबिन्सन हेलीकॉप्टर डॉसनव्हीलच्या दक्षिण-पश्चिम भागात दुर्घटनाग्रस्त झाले. हा भाग दाट जंगलाचा, पर्वतांचा आणि प्रतिकूल भौगोलिक रचनेचा मानला जातो. अपघातानंतर जेस्नी सुमारे पाच तास ढीगारा आणि कोसळलेल्या झाडा खाली अडकून राहिली. जॉर्ज फिजी यांनी सांगितले की जेव्हा जेस्नी हिला शुद्ध आली ती ढीगाऱ्या खाली होती. तिने पाहिले की तिचा पती जस्ने तिच्या छातीवर पडला होता.जेस्नी पेशाने नर्स असल्याने तिने डेव्हला स्पर्श करुन हाक मारली, परंतू त्याचे प्राण केव्हाच गेले होते.

लग्नानंतर हॉटेलात जाणार होते नवदाम्पत्य..

जेस्नी हिच्या शरीरावर अनेक जागी खोल जखमा आणि रक्तस्राव झाला असला तरी तिच्या शरीराचे कोणतेही हाड तुटलेले नाही. जेस्नी आपल्या पतीला गमावल्याने संपूर्णपणे कोसळून गेली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचे मते शुक्रवारी रात्री डॉसन काउंटी शेरिफ कार्यालयाला एक हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त मिळाले होते. नंतर फेडरल एव्हीएशन एडमिनिस्ट्रेशनने दुजोरा दिला की रात्री सुमारे साडे दहा वाजता डॉसनव्हीलच्या जवळ एक रॉबिन्सन आर 66 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. हेलिकॉप्टरमध्ये तीन लोक बसले होते.

घटना स्थळाजवळ राहणाऱ्या एका स्थानिकाने सांगितले की अपघानंतर बचाव कार्य करणे आव्हानात्मक होते. दाट जंगल आणि कठीण रस्ते असल्याने बचाव पथकाला घटना स्थळी पोहचलायला प्रचंड वेळ लागला. जखमी महिलेला बाहेर काढण्यास सुमारे सहा तास लागले.

हेलिकॉप्टरचे मालक कंपनी प्रेस्टिज हेलीकॉप्टर्सचे ऑपरेशन्स डायरेक्टर एंडी व्हिटेकर यांनी सांगितले की कंपनीच्या ४० वर्षांच्या इतिहास अशा प्रकारचा अपघात पहिल्यांदाच झाला आहे. या हेलिकॉप्टरचा पायलट याला हा मार्ग चांगला परिचित होता आणि कंपनीचा सुरक्षा रेकॉर्ड देखील चांगला आहे. या घटनेची चौकशी नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड करत आहे. प्राथमिक तपासणी अहवाल ३० दिवसात येण्याची आशा आहे.

 

 

Follow Us