डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं टेन्शन वाढवलं, मोठी खळबळ, आता या देशावर टाकणार थेट मदर ऑफ ऑल बॉम्ब्स

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा अमेरिकेनं आपल्या एका निर्णयाने जगभरात खळबळ उडून दिली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार आता अमेरिकेकडून थेट मदर ऑफ ऑल बॉम्ब्स टाकण्याची तयारी सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं टेन्शन वाढवलं, मोठी खळबळ, आता या देशावर टाकणार थेट मदर ऑफ ऑल बॉम्ब्स
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 5:18 PM

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी या दोन्ही देशामध्ये युद्धाची ठिणगी पडली होती. आधी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला, त्यानंतर अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे इराणकडून देखील इस्त्रायलवर अनेक मिसाईल डागण्यात आल्या, तसेच ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, त्या -त्या देशांवर देखील इराणकडून हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेनं निर्वाणीचा इशारा देऊन देखील इराण मागे घेण्यास तयार नाहीये, त्यामुळे आता अमेरिकेनं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

एका रिपोर्टनुसार अमेरिका आता थेट इराणच्या अणु ऊर्जा केंद्रावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. तशी योजना अमेरिकन सैन्यांकडून तयार केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून आता अमेरिका इराणच्या ऊर्जा केंद्रावर तसेच अणु केंद्रांवर अमेरिका आपला सर्वात मोठा बॉम्ब ज्याला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ असं म्हटलं जातं, थेट त्या बॉम्ब ने हल्ला करण्याची शक्यता आहे. हा जगातील सर्वात मोठा गैर अणुबॉम्ब आहे. या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Loading...

अमेरिकेनं 2017 मध्ये या बॉम्बने शेवटचा हल्ला अफगाणिस्तामध्ये केला होता. या हल्ल्यात मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी अमेरिका पुन्हा एकदा आपल्या या बॉम्बने इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. तशी तयारी सुरू असल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे, की जर पुन्हा युद्ध सुरू झालं तर यावेळी इराणच्या अणू ऊर्जा केंद्रावर ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ने हल्ला करण्यात येणार आहे. दरम्यान त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकू शकतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us