कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा

Trump Truck Escape : तुर्कीये मध्ये ट्रम्प यांना त्यांना त्यांच्या अधिकृत एअर फोर्स वन विमानातून उतरवण्यात आले आणि एका ट्रकच्या माध्यमातून दुसऱ्या विमानापर्यंत नेण्यात आले. यामागील कारण आता नेटफ्लिक्सच्या सिरीजमधून समोर येणार आहे.

कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
Donald Trump Truck Escape Resone
Image Credit source: Google
| Updated on: Sep 02, 2026 | 11:06 PM

सध्याच्या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते. मात्र, जर त्यांनाच सुरक्षेच्या कारणामुळे आपले अधिकृत वाहन सोडून ट्रकमधून प्रवास करावा लागला, तर ही घटना चर्चेचा विषय ठरणे स्वाभाविक आहे. अशीच एक घटना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घडली होती. डोनाल्ड ट्रम्प NATO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तुर्कीये येथे गेले होते.

त्या घटनेवर सिरीज येणार…

तुर्कीये मध्ये ट्रम्प यांना त्यांना त्यांच्या अधिकृत एअर फोर्स वन विमानातून उतरवण्यात आले आणि एका ट्रकच्या माध्यमातून दुसऱ्या विमानापर्यंत नेण्यात आले. त्यावेळी या घटनेमागे इराणकडून संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले होते. आता या संपूर्ण प्रकरणावर नेटफ्लिक्सची एक सीरिज समोर येणार आहे. या सीरिजमध्ये अमेरिकेचे अधिकारी या घटनेशी संबंधित संपूर्ण माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे.

नेटफ्लिक्सने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘INSTADOCS: THE DECOY PLANE’ नावाची सीरिज लॉन्च करण्यात येणार आहे. ही सीरिज 4 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण घटनाक्रम सांगितला जाणार आहे. तसेच या घटनेच्या वेळी ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पत्रकारांशीही संवाद साधण्यात येणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प कुणाला भ्यायले होते?

मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सीक्रेट सर्व्हिसने ट्रम्प यांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले होते. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे ट्रम्प यांना अचानक तेथून हलवण्यात आल्याचे पत्रकारांच्या लक्षातही आले नाही.

ही सीरिज जुलै 2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अधिकृत विमानाशी संबंधित घडलेल्या या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील समोर आणणार आहे. आतापर्यंत या घटनेबाबत सोशल मीडियावरील मीम्स आणि अज्ञात सूत्रांच्या हवाल्यानेच विविध माहिती समोर आली आहे. मात्र, नेटफ्लिक्सच्या या रिपोर्टमध्ये त्या वेळी Air Force One वर ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या मुलाखतीही दाखवण्यात येणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, या सीरिजच्या माध्यमातून अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिसेस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षेला किती गांभीर्याने घेते, हेही समोर येणार आहे. राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाण्यास तयार असते, हे या घटनाक्रमातून स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us