India Nepal : संकटानंतर अखेर नेपाळचे डोळे उघडले, खरा मित्र कोण ते कळलं, चीनला सोडून भारताला दिलं पहिलं प्राधान्य

India Nepal : संकट येत तेव्हाचं आपले कोण ते कळतात. नेपाळच्या बाबतीत सुद्धा हेच झालं आहे. नेपाळ काही काळापूर्वी चीनच्या खूप प्रेमात होता. त्यांचे गुणगान करत थकत नव्हता. पण आता त्यांना आपलं कोण ते समजलं आहे. म्हणून त्यांनी तसाच निर्णय सुद्धा घेतला आहे.

India Nepal : संकटानंतर अखेर नेपाळचे डोळे उघडले, खरा मित्र कोण ते कळलं, चीनला सोडून भारताला दिलं पहिलं प्राधान्य
Balen shah-Jinping-Narendra Modi
| Updated on: Oct 15, 2026 | 9:42 PM

India Nepal : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी विनाशकारी पूर आला होता. त्यावेळी भारताने पुढे येऊन मदत केली. रेशन, वैद्यकीय सुविधा भारताने नेपाळला उपलब्ध करुन दिल्या. भारताने केलेल्या या मदतीमुळे आता नेपाळचे डोळे उघडले आहेत. नेपाळ आणि भारताचे संबंध आता हळूहळू रुळावर येत आहेत. नेपाळ काही काळापूर्वी चीनच भरपूर गुणगान करत होता. आता वाईट काळात भारताने केलेल्या मदतीमुळे खरा मित्र कोण, हे नेपाळच्या चांगलं लक्षात आलं आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी मोठं पाऊल उचलत चीनला झटका दिला आहे. त्यांनी भारताला प्राधान्य दिलं आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह पहिल्या द्विपक्षीय भारत दौऱ्यावर येत आहेत. पुढच्या महिन्यात ते भारतात येण्याची तयारी करत आहेत. बालेन शाह नोव्हेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पहिल्या अधिकृत द्विपक्षीय भारत दौऱ्यावर येऊ शकतात. त्यांच्या या दौऱ्यात भारत-नेपाळमध्ये सीमावाद, हवाई मार्ग, व्यापार आणि अन्य मुद्यांवर चर्चा होऊ शकते.

बालेन शाह यांचा हा भारत दौरा यासाठी महत्वाचा मानला जात आहे, कारण आपल्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी त्यांनी चीन ऐवजी भारताची निवड केली आहे. कदाचित भारताचं महत्वही नेपाळच्या लक्षात आलं असेल. काठमांडू पोस्टच्या रिपोर्टनुसार, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, सीमावाद, पुरामुळे झालेलं नुकसान मुद्यांवर भारत दौऱ्यात चर्चा होऊ शकते. नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाचीही निवड झाल्यानंतर ते आपला पहिला परदेश दौरा भारताचा करतात ही आतापर्यंतची परंपरा आहे. मागच्या काही काळात नेपाळच्या पंतप्रधानांनी म्हणजे बालेन शाह यांनी अशी काही वक्तव्य केली की, त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला.

Loading...

नेपाळची अनेक वर्षांची परंपरा तुटली

सीमावादावरील त्यांचं वक्तव्य जास्त चर्चेत आलं. 2021 साली शेर बहादुर देउबा COP26 ब्रिटनला गेले होते. त्यानंतर 2024 साली नेपाळमध्ये सत्तेवर आल्यानंतर ओली यांनी भारताऐवजी चीनची निवड केली होती. त्यामुळे नेपाळची अनेक वर्षांची परंपरा तुटली. भारताने निमंत्रण दिलं नाही असं ओली यांचा दावा होता. म्हणून ते भारताऐवजी चीनला गेले. आता पुन्हा एकदा नेपाळी पंतप्रधान आपल्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारतात येत आहेत.

दोन्ही बाजूंमध्ये वेगवेगळ करार होतील

अजून तारीख फिक्स नसल्याचं हाय लेवल डिप्लोमॅटिक सोर्सने सांगितलं. काही नेपाळी आणि भारतीय मीडिया आउटलेट्सनी बालेन शाह 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने अजून तारीख ठरली नसल्याचं सांगितलं. तीन दिवसांचा हा दौरा असेल. बालेन शाह तीन दिवस दिल्लीतल राहतील असा अंदाज आहे. बालेन शाह पंतप्रधान मोदींसोबत डेलीगेशन लेवलची चर्चा करतील. दुसऱ्या वरिष्ठ भारतीय मंत्र्यांना भेटतील. नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार दोन्ही बाजूंमध्ये वेगवेगळ करार होतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us