नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;

अमेरिकेतील अ‍ॅरिझोनाच्या ग्रँड कॅन्यन परिसरात अचानक आलेल्या जलप्रलयाने हाहाकार माजवला आहे. 20 हून अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक पादचारी पूल वाहून गेले आहेत. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत 62 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. भविष्यातील वादळाचा इशारा असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;
Arizona floods
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 5:40 PM

अमेरिकेच्या अ‍ॅरिजोनामध्ये आज नेपाळसारखीच परिस्थिती उद्भवली. अ‍ॅरिजोनाच्या अँजेल कैन्यन आणि फँटम रेंच परिसरात अचनाक पूर आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अमेरिकन नॅशनल पार्क सर्व्हिसनुसार, या घटनेनंतर 20 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. हे लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 29 ऑगस्ट रोजी ब्रायंट एंजेल क्रीक कॉरिडोअरसोबत कैन्यनमध्ये एखाद्या हायकर्स वा बॅकपैकर्स असल्याचं माहित असेल किंवा प्रभावित कॅरिडोअरमध्ये कँप ग्राऊंड रिझर्व्हेशन कुणी केलं असेल तर त्याची माहिती नॅशनल पार्क सर्व्हिसच्या इनव्हेस्टिगेटिव्ह सर्व्हिस ब्रँचला द्या. असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सिन्हुआ वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार, पार्कचे अधिकारी अ‍ॅरिजोना डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीसोबत मिळून मदत कार्य करत आहेत. तसेच प्रभावित क्षेत्रातील लोक सुरक्षित आहे की नाही याची माहितीही घेण्यात येत आहे. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजीच्या सकाळपर्यंत प्रशासनाने 62 लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. फँटम रेंच आणि लोअर नॉर्थ काइबाब ट्रेल परिसरातून या लोकांची सुटका करण्यात आली आहे.

सर्व पादचारी पूल वाहून गेले

सुटका करण्यात आलेल्या लोकांना साऊथ रिम येथील मॅस्विक लॉज कॅफेटेरियामध्ये आणण्यात आलं आहे. या ठिकाणी अमेरिकन रेड क्रॉस त्यांची मदत करत आहे. प्रशासनाच्या मते, ताज्या आकडेवारीनुसार, अजून पर्यंत या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. अचानक आलेल्या पुरामुळे ब्राइट अँजेल कैन्यनच्या मूळ ढाच्याला मोठं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ब्राइट अँजेल क्रीकवर बनवण्यात आलेले सर्व पादचारी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांना नदी पार करून जाणं कठिण झालं आहे.

वादळाचा इशारा

दरम्यान, या पुरामुळे किती नुकसान झालं याची मोजदाद सुरू आहे. पार्कचे कर्मचारी ट्रेल्स, पूल, वीज-पाणी पुरवठा करणारी यंत्रणा, इमारती आणि इतर काय काय नुकसान झालं याची माहिती घेत आहेत. त्याशिवाय या भागात वादळी पावसाचा अलर्टही जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यापेक्षा अधिक फ्लॅश फ्लड, मातीचा ढिगारा वाहून जाणे, डोंगराच्या कडा कोसळणे आदी घटनांमुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने, बचाव कार्य सुरू असल्यामुळे सतर्क राहण्याचे आणि प्रभावित क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us