अरे डोनाल्ड ट्रम्प यांना नाही जमत, तुम्ही करून टाका, युद्धादरम्यान इराणला मोठा सल्ला, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष इराणकडे आहे. मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. यादरम्यानच सध्या सर्व देश बघ्याची भूमिका घेत आहेत. नुकताच इराणला अत्यंत मोठा सल्ला देण्यात आला. ज्यामुळे युद्धात गोष्टी बदलू शकतात.

अरे डोनाल्ड ट्रम्प यांना नाही जमत, तुम्ही करून टाका, युद्धादरम्यान इराणला मोठा सल्ला, थेट..
Iran America war
| Updated on: Apr 03, 2026 | 1:48 PM

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. अमेरिकेने भीषण हल्ले इराणवर करण्यास सुरूवात केली. इराणच्या मोठ्या पुलाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. युद्धात एकही देश मदतीला पुढे येत नसल्याचे लक्षात देताच युद्ध लवकरात लवकर संपवण्याकरिता इस्त्रायलसोबत मिळून इराणमध्ये अमेरिकेकडून थैमान घातला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला 35 दिवस होत आहेत. या युद्धामुळे जग भयंकर संकटात आहे. युद्ध फक्त तीन देशांपुरते मर्यादित राहिले नाही. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध जिंकायचे आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पद्धतीने इराणने काऊंटर करण्याचा सल्ला देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीत इराणी लोकांबद्दल मोठे विधान केले.

त्यांनी इराणी लोकांचे काैतुक केले. हेच नाही तर लवकरत चर्चा होईल, असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबत चर्चा करायची असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी इराणच्या सरकारला अत्यंत मोठा सल्ला दिला. त्यांनी इराणच्या सरकारला स्पष्ट शब्दात म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत नाहीये तर तुम्ही करा आणि युद्ध बंद करा.

जावेद जरीफ यांनी म्हटले की, तुम्ही स्वत:ला विजेता म्हणून घ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पद्धतीने आणि युद्ध थांबवा. इराणने युद्धबंदीचा करार करायला हवा आणि युद्ध थांबवून विजता घोषित करून घ्यावे. हे खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठा मास्टरस्ट्रोक होईल. जावेद जरीफ यांनी आपल्या देशाला मोठी विनंती केली आणि युद्धबंदी करार करावा, असेही त्यांनी म्हटले.

युद्ध थांबवण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा यापेक्षा मोठा दुसरा कोणताही मार्ग नसू शकतो, असे त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका युद्ध गेल्या एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. या युद्धात अनेक देश होरपळली जात आहेत. युद्ध थांबवण्याची मागणी होत असताना युद्ध अधिक भडकत आहे. पुढील काही दिवसात युद्धबंदीबद्दल काही घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.

Follow Us