रागाच्या भरात करोडोचं दान, गुगलच्या सहसंस्थापकाच्या निर्णयाने जगाला आश्चर्य

गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी एका कराच्या निषेधार्थ लाखो रुपयांची देणगी दिली आहे. या कर प्रस्तावामुळे अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगात आणि राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रागाच्या भरात करोडोचं दान, गुगलच्या सहसंस्थापकाच्या निर्णयाने जगाला आश्चर्य
sergey brin
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 6:01 PM

गुगलचे (Google) सह-संस्थापक सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या कराच्या (Tax) वादात एक मोठे आणि धक्कादायक पाऊल उचलले आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रिन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये प्रस्तावित असलेल्या एका नवीन व्यावसायिक कर कायद्याच्या विरोधात सुमारे ५ लाख डॉलर (जवळपास ४.७७ कोटी रुपये) देणगी दिली आहे. ही रक्कम अशा राजकीय समितीला देण्यात आली आहे जी ‘Overpaid CEO Tax’ नावाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत आहे. या कर प्रस्तावावरून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सध्या मोठी राजकीय लढाई सुरू आहे.

काय आहेत ‘Measure C’ आणि ‘Measure D’ कर प्रस्ताव?

आगामी २ जून रोजी तेथील मतदार Measure C आणि Measure D या दोन वेगवेगळ्या कर प्रस्तावांवर मतदान करणार आहेत:

Measure C (मेझर सी): या प्रस्तावाला व्यावसायिक संघटना आणि बिझनेस ग्रुप्सचा मोठा पाठिंबा मिळत आहे. याअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना करात सवलत देण्याची तरतूद आहे. छोट्या व्यवसायांसाठी करातील सवलतीची मर्यादा ५० लाख डॉलरवरून ७५ लाख डॉलरपर्यंत वाढवण्याची सूचना यात करण्यात आली आहे. मात्र, या बदल्यात मोठ्या कंपन्यांवरील कराचा बोजा वाढणार आहे.

Measure D (मेझर डी): दुसरीकडे, ‘मेझर डी’ हा प्रस्ताव चांगलाच वादात सापडला आहे. यालाच ‘Overpaid CEO Tax’ म्हटले जात आहे. या प्रस्तावानुसार, कंपनीचे सीईओ (CEO) आणि सामान्य कर्मचारी यांच्या पगारातील तफावतीच्या (अंतराच्या) आधारे कर निश्चित केला जाईल. विशेष म्हणजे, यात केवळ सॅन फ्रान्सिस्कोमधीलच नव्हे, तर कंपनीच्या जगभरातील (ग्लोबल) कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही विचार केला जाणार आहे.

कामगार संघटना आणि पुरोगामी गटांचे म्हणणे आहे की, शहराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मोठ्या आणि श्रीमंत कंपन्यांनी जास्त कर भरायला हवा. परंतु, या करामुळे कंपन्या सॅन फ्रान्सिस्को सोडून जाऊ शकतात आणि त्याचा थेट परिणाम येथील रोजगारावर होईल, असा दावा व्यावसायिक गटांकडून केला जात आहे.

सर्गेई ब्रिन यांची नाराजी आणि स्थलांतर

सर्गेई ब्रिन हे याच मुद्द्यावरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी केवळ विरोध करण्यासाठीच नव्हे, तर एका पर्यायी आणि ‘बिझनेस-फ्रेंडली’ (व्यवसायाला अनुकूल) प्रस्तावालाही आर्थिक मदत केली आहे. ब्रिन यांची एकूण संपत्ती सुमारे २६० अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे. काही काळापूर्वी त्यांनी आपले वास्तव्य कॅलिफोर्नियाहून हलवून नेवाडामधील (Nevada) लेक टाहोजवळ (Lake Tahoe) केले होते. नेवाडा राज्यामध्ये ‘राज्य कर’ (State Tax) नसल्याने त्यांचा हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर मानला जातो.

समाजवादाला ब्रिन यांचा ठाम विरोध

ब्रिन यांनी नुकतेच एका जाहीर निवेदनात स्पष्ट केले होते की ते समाजवादाच्या (Socialism) विरोधात आहेत. त्यांचे कुटुंब १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनमधून पळून अमेरिकेत आले होते आणि त्यांनी समाजवादाचे तोटे अगदी जवळून अनुभवले आहेत, असे ते म्हणाले. ब्रिन यांच्या मते, कॅलिफोर्नियाने त्याच चुकीच्या मार्गावर जावे अशी त्यांची अजिबात इच्छा नाही.

Follow Us