पाकिस्तानात हाहाकार! थेट या प्रांतमध्ये आणीबाणी लागू, सरकारने या..

पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार उडाला आहे. त्यातच थेट आणीबाणी लावण्याची मोठी नामुष्की सरकारवर आली. पाकिस्तानात वाढलेल्या महागाई विरोधात लोक रस्त्यावर उतरत आहेत. माजी मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.

पाकिस्तानात हाहाकार! थेट या प्रांतमध्ये आणीबाणी लागू, सरकारने या..
Shehbaz Sharif Pakistan
| Updated on: Oct 18, 2026 | 10:41 AM

पाकिस्तानात मोठी अराजकता माजली आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तानच्या समस्या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यातच पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतात आणीबाणीची मोठी लागू केली. यादरम्यान शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, दहशतवादाविरुद्धच्या कारवायांमध्ये सहकार्याची गरज असल्यामुळे सरकारला असे पाऊल उचलणे भाग पडले. पाकिस्तानात थेट आणीबाणी लावण्याची वेळ त्यांच्यावर आली. शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या प्रांतीय सरकारचे अधिकार काढून घेण्याचे पाऊल अनिच्छेने उचलण्यात आले होते. सरकारने परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 48 तासाचा वेळ घेतला आणि अखेर त्यानंतर आणीबाणी जाहीर करावी लागली.

सरकारने अनेक प्रयत्न केली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या बाजूला सरकारला धमक्या दिल्या जात होत्या. मोर्चे काढले जात होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी संविधान अनुच्छेद 232 आणि 234 नुसार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी खैबर पख्तूनख्वा राज्यात आणीबाणीची घोषणा केली. त्यानंतर पीटीआयकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली.

Loading...

माजी मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स फाऊंडेशनने पाकिस्तानच्या या पावसामुळे सैन्य समर्थित सत्ता मिळवण्याचा कट असल्याचे म्हटले. यादरम्यान रस्त्यावर सैन्य तैनात करण्यात आले. माजी मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांना अटक करत इंटरनेटसेवा बंद केल्याने मोठी टीका केली जात आहे. पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली.पाकिस्तानात स्थिती गेल्या काही दिवसांपासून चिघळताना दिसत आहे.

त्यातच आता थेट आणीबाणी लावण्याची वेळ आली. सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांकडून अनेकदा लाठीचार्जही करण्यात आला. आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पहिल्यांदाच ते यावर बोलताना दिसले. पाकिस्तानात महागाईचे मोठे संकट आहे. लोक महागाई विरोधात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. यासोबतच वाढलेल्या वीज दराविरोधातही लोक आवाज उठवताना दिसले. त्यातच आता सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us